IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings News Marathi sakal
IPL

MI vs CSK IPL 2024 : ठरलं तर मग... एकच होणार एल क्लासिको! पांड्याच्या होम ग्राऊंडवर ऋतुराजची CSK 'या' तारखेला देणार MI ला टक्कर

IPL 2024 Schedule: निवडणूकीच्या धामधुमीत आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याचे शेड्युल जाहीर, पाहा एका क्लिकवर

Kiran Mahanavar

IPL 2024 Schedule Mumbai Indians vs Chennai Super Kings : सध्या भारतात आयपीएल 2024 चा धूमधडाका सुरू आहे. लीगच्या या सतराव्या हंगामात आतापर्यंत 5 सामने खेळले गेले आहेत. आतापर्यंत केवळ सात एप्रिलपर्यंतच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते.

देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात केवळ 17 दिवसांचे वेळापत्रक जारी करण्यात आले होते. या कालावधीत 4 डबल हेडरसह एकूण 21 सामने खेळवले जाणार होते. आता पूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे.

आता आयपीएल 2024 चे 8 एप्रिल ते 26 मे पर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना 8 एप्रिल रोजी कोलकाता नाइट रायडर्सशी होणार आहे. हा सामना चेपॉक येथे संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.

यादरम्यान आयपीएलची एल क्लासिको मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात 14 एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार आहे, या हंगामात दोन्ही संघ फक्त एकदाच भिडणार आहे. आयपीएलचा पहिला सीझन 2008 मध्ये खेळला गेला होता. मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांनी प्रत्येकी सर्वाधिक 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे.

आयपीएल 2024 चा क्वालिफायर 1 सामना 21 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. 17व्या हंगामातील एलिमिनेटर सामना 22 मे रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. दुसरा क्वालिफायर सामना 24 मे रोजी चेन्नई येथे होणार आहे. तसेच या मोसमातील अंतिम सामना रविवार 26 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT