IPL 2024 Gujarat Titans eliminated from playoff race sakal
IPL

IPL 2024 Playoffs : प्लेऑफच्या शर्यतीतून 3 संघ बाहेर, 1 क्वालिफाय, 'या' 6 संघाचे मालक टेन्शनमध्ये

IPL 2024 Playoffs : गुजरात टायटन्स कोलकता नाइट रायडर्स यांच्यामधील आयपीएल साखळी फेरीचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. याचा फटका गुजरातला बसला.

Kiran Mahanavar

IPL 2024 Playoffs : गुजरात टायटन्स कोलकता नाइट रायडर्स यांच्यामधील आयपीएल साखळी फेरीचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. याचा फटका गुजरातला बसला. शुभमन गिलच्या गुजरात संघाचे आयपीएलच्या यंदाच्या मोसमात प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे आव्हान संपुष्टात आले. कोलकता संघाला मात्र याचा फायदा झाला. आता त्यांचा संघ अव्वल दोन स्थानांमध्ये कायम राहणार आहे. यामुळे कोलकता संघाला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संधी उपलब्ध होणार आहेत.

या लढतीआधी गुजरातच्या दोन लढती बाकी होत्या. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी गुजरातला दोनही लढतींमध्ये विजय मिळवणे गरजेचे होते. पण कोलकताविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाल्यामुळे त्यांना फक्त एकच गुण मिळाला. आता अखेरच्या लढतीत विजय मिळवला तरीही त्यांना १३ गुणांचीच कमाई करता येणार आहे. १३ गुणांसह त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश करता येणार नाही. आणि प्लेऑफमधून बाहेर पडणारा तिसरा संघ ठरला आहे. कोलकता संघाची गुणसंख्या आता १९वर पोहोचली आहे.

प्लेऑफचे चित्र जवळपास स्पष्ट

गुजरात टायटन्सच्या या पराभवाने प्लेऑफचे चित्रही जवळपास स्पष्ट होत आहे. आता 10 पैकी तीन संघ - गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स प्लेऑफमधून बाहेर आहेत, तर KKR प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत.

आता रेसमध्ये फक्त राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे संघ राहिले आहेत. सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स व्यतिरिक्त उर्वरित 4 संघांनी 13 सामने खेळले आहेत.

सहा संघांमध्ये चुरशीची लढत

सीएसकेचे 13 सामन्यांनंतर 14 गुण आहेत, आरसीबीचे 13 सामन्यांनंतर 12 गुण आहेत आणि दिल्ली कॅपिटल्सचे 13 सामन्यांनंतर 12 गुण आहेत. तर राजस्थानचे 12 सामन्यांनंतर 16 गुण आहेत, हैदराबादचे 12 सामन्यांनंतर 14 गुण आहेत आणि लखनौचे 12 सामन्यांनंतर 12 गुण आहेत. या तिन्ही संघांना अजून संधी आहेत.

आणि खरा धोका सीएसके, आरसीबी आणि डीसीवर राहिला आहे, कारण त्यांचा फक्त एक सामना आहे. सीएसके आणि आरसीबी आमनेसामने येणार आहेत. तर मंगळवारी डीसीचा सामना एलएसजीशी होणार आहे. दिल्ली हरला तर तो प्लेऑफमधून बाहेर जाईल. आता लीगमध्ये फक्त 7 सामने बाकी आहेत. अशा परिस्थितीत कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पारा घसरला; आजपासून थंडीचा जोर वाढणार

Rahul Gandhi : मोदींचा डोळा राज्याच्या संपत्तीवर...राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

SCROLL FOR NEXT