rinku singh fan refuses to return ball from stands policeman retrieves it by force sakal
IPL

IPL 2024 KKR : रिंकूच्या फॅनचा धिंगाणा! पोलिसांनी पॅन्टमधून शोधून काढला मॅच मधला चेंडू... १६ सेकंदांचा मजेशीर व्हिडिओ Viral

गेल्या शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या खेळल्या गेलेल्या सामन्यात एक अशी घटना घडली ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Kiran Mahanavar

IPL 2024 KKR Viral Video : आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने गेल्या शनिवारी मुंबई इंडियन्ससोबत ईडन गार्डन्सवर शेवटचा होम सामना खेळला, जो त्यांनी 18 धावांनी जिंकला. दरम्यान एक अशी घटना घडली ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरं तर इडन गार्डन्सवर रिंकू सिंगच्या एका चाहत्याने चेंडू चोरण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी तो पकडला गेला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रिंकू सिंगच्या नावाचा टी-शर्ट घातलेला एक KKR चाहता त्याच्या पॅन्टमध्ये क्रिकेटचा चेंडू लपवताना दिसत आहे.

दरम्यान, रिंकू फॅनला हे करताना एका पोलीस कर्मचाऱ्यानेही पाहिले, त्यानंतर तो मध्ये आला आणि फॅनकडून चेंडू हिसकावून घेतला. आणि परत मैदानात फेकतो. त्यानंतर पोलीस कर्मचारी रिंकू फॅनला तिथून ढकलून हाकलताना दिसत आहे. असे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून येते आहे. पण यानंतर त्या चाहत्याचे काय झाले याचे माहिती कोणाकडे नाही.

जर आपण केकेआर संघाबद्दल बोललो तर, त्यांनी या आयपीएल 2024 च्या हंगामात अप्रतिम कामगिरी केली आहे. 13 सामन्यांनंतर कोलकाता नाईट रायडर्स 9 विजय आणि 19 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे आणि प्लेऑफसाठीही पात्र ठरले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT