IPL

IPL 2024 KKR vs SRH : क्लासेनचा क्लास! मात्र राणाने शेवटच्या षटकात केला एसआरएचचा खेळ खल्लास

IPL 2024 Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Score Updates News : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या शनिवारी ‘डबल हेडर’मध्ये आज दुसरा सामना कोलकता आणि हैदराबाद यांच्यात रंगला आहे.

Kiran Mahanavar

IPL 2024 Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Score Updates News :

आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्सने सनराईजर्स हैदराबादचा 4 धावांनी पराभव करत थरारक विजय मिळवला. केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 208 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या सनराईजर्स हैदराबादने 204 धावांपर्यंत मजल मरली. हैदराबादकडून हेन्री क्लासेनने 29 चेंडूत 63 धावा चोपल्या अन् केकेआरचं टेन्शन वाढवले होते. हैदराबादला विजयासाठी 13 धावांची गरज होती. मात्र अखेरचे षटक टाकणाऱ्या हर्षित राणाने फक्त 8 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. केकेआरकडून फलंदाजी करताना आंद्रे रसेलने 63 धावांची धडाकेबाज खेळी केली.

क्लासेनचा क्लासिक खेळ मात्र विजयाचं दान केकेआरच्या पारड्यात 

24 चेंडूत 76 धावांची गरज असताना हेन्री क्लासेनने क्लासिक इनिंग खेळली. त्याने तीन षटकात 63 धावा ठोकल्या. क्लासेनने सामना 6 चेंडूत 13 धावा असा आणला होता. मात्र हर्षित राणाने शेवटच्या षटकात फक्त 8 धावा देत दोन विकेट्स घेतल्या अन् केकेआरने सामना 4 धावांनी जिंकला.

IPL 2024 KKR vs SRH Live Score : केकेआरचा धावांचा डोंगर, हैदराबादचेही प्रत्युत्तर

केकेआरने विजयासाठी 209 धावांचे आव्हान ठेवले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने 6 षटकात 60 धावांची सलामी दिली. मयांक अग्रवाल आणि अभिषेक शर्माने प्रत्येकी 32 धावा केल्या. केकेआरने त्यानंतर दोन धक्के देत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र चक्रवर्तीने त्रिपाठीचा झेल सोडला. त्रिपाठी अन् माक्ररमने याचा फायदा उचलत संघाला 10 षटकात 99 धावांपर्यंत पोहचवले.

IPL 2024 KKR vs SRH Live Score : आंद्रे रसेलच्या वादळात हैदराबादची धूळधाण, मिळालं 209 धावांचे आव्हान

आंद्रे रसेलने 7 षटकार आणि 3 चौकारांच्या साथीने 64 धावा ठोकल्या. या तुफानी खेळीच्या जोरावर केकेआरने शेवटच्या तीन षटकात जवळपास 67 धावा केल्या अन् हैदराबादसमोर विजयासाठी 209 धावांचे आव्हान उभे केले. केकेआरने 20 षटकात 7 बाद 208 धावा केल्या. रिंकू सिंहने देखील 23 धावा केल्या. सलामीवीर फिल्प सॉल्ट देखील 54 धावांचे योगदान दिलं.

IPL 2024 KKR vs SRH Live Score : केकेआरची मधली फळी देखील ढेपाळली, मदार रिंकू अन् रसेलवरच

सनराईजर्स हैदराबादच्या टी नटराजन आणि मार्कंडेय यांनी दमदार गोलंदाजी करत केकेआरची अवस्था 15 षटकात 6 बाद 130 धावा अशी केली आहेत. शेवटच्या पाच षटकात आता मदार आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह यांच्यावर असणार आहे.

IPL 2024 KKR vs SRH Live Score : केकेआरचे 8 षटकात 4 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये, पॅटच्या नेतृत्वात हैदराबादचा नवा अवतार

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनराईजर्स हैदराबादच्या संघाने जबदस्त सुरूवात केली. पहिल्या आठ षटकात केकेआरची 4 फलंदाज गारद करत सामन्यावर पकड निर्माण केली. फिल्प सॉल्टने एक बाजू लावून धरल्याने केकेआरने 9 षटकात 66 धावांपर्यत पोहचवले.

IPL 2024 KKR vs SRH Live Score : नटराजनने केकेआरला नाचवले, पॉवर प्लेमध्येच टॉप ऑर्डर उडवली

हैदराबादच्या टी नटराजनने केकेआरच्या टॉप ऑर्डरला सुरूंग लावला. व्यंकटेश अय्यरला 7 तर श्रेयस अय्यरला शुन्यावर बाद करत केकेआरची अवस्था 3 बाद 32 धावा अशी केली.

IPL 2024 KKR vs SRH Live Score : केकेआरची आक्रमक सुरूवात मात्र सुनिल नारायणची गोंधळात पडली विकेट

फिल्प सॉल्ट आणि सुनिल नारायणने केकेआरला दमदार सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र 2 षटकात 23 धावा झाल्या असताना सॉल्ट आणि नारायण यांच्यातील गोंधलामुळे नारायण धावबाद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC HSC Exam : मोठी बातमी! बारावीची ११ फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

Kolhapur School Incident: शाळेचं गेट अंगावर पडून विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू! कोल्हापुरात घडली हृदयद्रावक घटना

Ambernath Crime: आईच बनली वैरीण! नवजात बाळाला 17 व्या मजल्यावरुन फेकले, हृदय पिळवटून टाकणारी घटना

पुन्हा चालणार सलमान - करिश्माची जादू; मोठ्या पडद्यावर पुन्हा प्रदर्शित होणार 'बीवी नंबर 1'

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निकालापूर्वीच घडामोडींना वेग; नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT