IPL 2024 LSG Shamar Joseph ESAKAL
IPL

IPL 2024 LSG Shamar Joseph : ऑस्ट्रेलियात धुमाकूळ घालणारा शामर जोसेफ लखनौ सुपर जायंट्सच्या लागला गळाला

IPL 2024 LSG signs Shamar Joseph : शामरने नुकतेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दमदार गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले होते

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 Lucknow Super Giants signs Shamar Joseph : लखनौ सुपर जायंट्सने वेस्ट इंडीजचा युवा वेगवान गोलंदाज शामर जोसेफला आपल्या गोटात खेचलं आहे. लखनौने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडची रिप्लेसमेंट म्हणून जोसेफला आपल्या संघात सामील करून घेतलं आहे. यासाठी लखनौने 3 कोटी रूपये मोजले.

वेस्ट इंडीजचा युवा वेगवान गोलंदाज शामर जोसेफने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेत धुमाकूळ घातला होता. त्याच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाने आपला बालेकिल्ला, गाबा गमावला. या विजयाचा मुख्य शिल्पकार हा जोसेफच होता.

सामन्यावेळी त्याच्या पायाला दुखापत झाली होती. मात्र तरी देखील त्याने सामन्यात गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. ऑस्ट्रेलियाला कसोटीत गाबामध्ये मात देणारा भारतानंतर वेस्ट इंडीज दुसरा देश ठरला होता.

शामर सध्या पायाच्या दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे त्याने इंटरनॅशनल लीग टी 20 स्पर्धेतून माघार घेतली आहे. मात्र तो आता आयपीएलमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. तो केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणार आहे.

लखनौ सुपर जायंट्सने अधिकृत वक्तव्य देखील प्रसिद्ध केलं. या वक्तव्यात लखनौ म्हणते की, 'लखनौ सुपर जायंट्स शामर जोसेफ याला मार्क वूडची प्लेसमेंट म्हणून घोषित करत आहे. आगामी आयपीएल 2024 मध्ये तो लखनौकडून खेळेल. त्याला 3 कोटी रूपये देण्यात आले आहेत.'

'वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियाविरूद्ध गाबा कसोटीत विजय मिळवाला. जोसेफ हा वेस्ट इंडीजला विजय मिळवून देण्यात आघाडीवर होता. त्याने दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेतल्या होत्या.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT