Punjab Kings vs Delhi Capital IPL 2024 Score : दिल्ली कॅपिटल्सच्या 175 धावांचे आव्हान पांजाब किंग्जने 19.2 षटकात 6 फलंदाजांच्या मोबदल्या पार केले. पंजाब किंग्जकडून सॅम करनने दमदार फलंदाजी कर 63 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर त्याला लिम लिव्हिंगस्टोनने 21 चेंडूत 38 धावा करत चांगली साथ दिली.
दिल्लीकडून खलील अहमद आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. ऋषभ पंत 454 दिवसांनी क्रिकेटच्या मैदानावर परतला. मात्र पहिल्या सामन्यात त्याला पराभवाचे तोंड पहावे लागले.
खलील अहमदने 19 व्या षटकात 4 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. त्यामुळे आता सामना 6 चेंडूत 6 धावा असा आला आहे. स्ट्राईकवर लिव्हिंगस्टोन होता. मात्र सुमित कुमारने सलग दोन वाईड टेंडू टाकत खराब सुरूवात केली. अखेर एक चेंडू चांगला टाकला अन् सामना 5 चेंडूत 4 धावा असा आला. लिव्हिंगस्टोनने पुढच्या चेंडूवर षटकार मारत सामना जिंकून दिला.
सॅम करनने 47 चेंडूत 63 धावा ठोकत पंजाब किंग्जला सामन्यात आणलं. मात्र 10 चेंडूत विजयासाठी 8 धावांची गरज असताना खलील अहमदने करन अन् शशांक सिंहला पाठोपाठ बाद करत सामन्यात रंगत निर्माण केली.
पंजाब किंग्जला विजयासाठी 36 चेंडूत 63 धावा हव्या आहेत. लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन खेळत आहेत. ही पंजाबची फलंदाज म्हणून शेवटची जोडी असून दिल्ली सामन्यावर पकड निर्माण करण्यासाठी जोर लावत आहे.
प्रभसिमरन आणि सॅम करन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी रचत सामन्यावर पकड निर्माण केली होती. मात्र कुलदीप यादवने प्रभसिमरनला 26 धावांवर बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला.
पंजाबने दिल्लीच्या 175 धावांच्या प्रत्युत्तरात खेळताना चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र 16 चेंडूत 22 धावा करणाऱ्या शिखर धवनचा इशांत शर्माने त्रिफळा उडवत पंजाबला पहिला धक्का दिला. पंजाबच्या 3.1 षटकात 1 बाद 34 धावा झाल्या होत्या.
दिल्ली कॅपिटल्सची अवस्था बिकट असताना अभिषेक पोरेल हा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळण्यासाठी आला. त्याने चांगली गोलंदाजी करणाऱ्या हर्षल पटेलची बॉलिंग फिगरच बदलून टाकली. त्याने शेवटच्या षटकात तीन चौकार आणि दोन षटकार मारले. पोरेलने 10 चेंडूत 32 धावा ठोकल्या. दिल्लीने 20 षटकात 9 बाद 174 धावा केल्या आहेत.
दिल्ली कॅपिटल्सने धडाकेबाज सुरूवात केली होती. मात्र पंजाबच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत दिल्लीची अवस्था 17 षटकात 7 बाद 137 धावा अशी केली.
अखेर 453 दिवसांनी परतलेल्या ऋषभ पंतला साथ देणारा शाय होप 33 धावा करून बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंतने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. मात्र 13 चेंडूत 18 धावा करून तो देखील बाद झाला. पंत बाद झाला त्यावेळी दिल्ली कॅपिटल्सच्या 4 बाद 111 धावा झाल्या होत्या.
दिल्ली कॅपिटल्सला दमदार सुरूवात करून देणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला हर्षल पटेलने 29 धावांवर बाद केले.
तुफानी सुरूवातनंतर ऋषभ पंतच्या संघाला पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने मोठा धक्का दिला. मार्श आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दिल्लीला वेगवान सुरुवात करून तीन षटकांत धावसंख्या 30 च्या पुढे नेली. पण चौथे षटक टाकायला आलेल्या अर्शदीपने षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर मार्शला झेलबाद केले. 12 चेंडूत 20 धावा करून मार्श बाद झाला. शाई होप वॉर्नरसोबत क्रीजवर उपस्थित आहे.
पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत 15 महिन्यांनंतर मैदानात परतला आहे. डिसेंबर 2022 मध्ये कार अपघातात जखमी झाल्याने पंत गेल्या वर्षी आयपीएलमध्ये खेळू शकला नव्हता.
पंजाबचे चार परदेशी खेळाडू म्हणजे जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन आणि कागिसो रबाडा. त्याचवेळी दिल्लीचे चार विदेशी खेळाडू शाई होप, मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर आणि ट्रिस्टन स्टब्स आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.