IPL 2024 Play Off RCB vs CSK esakal
IPL

IPL 2024 Play Off : प्ले ऑफसाठी कोणाला किती संधी; हैदराबादची 87, चेन्नईची 72 टक्के शक्यता; तर आरसीबी...

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 Play Off RCB vs CSK : आयपीएलचे अधिकृत टीव्ही ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने नुकतेच आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये पोहचण्याची कोणत्या संघाला किती टक्के संधी आहे याची माहिती दिली. सर्वाच्या चर्चेचा विषय असलेली चेन्नई सुपर किंग्ज आणि सनराईजर्स हैदराबाद यांना सर्वात जास्त चान्स आहे. आरसीबीला देखील संधी आहे मात्र त्याची टक्केवारी खूपच कमी आहे.

सनराईजर्स हैदराबादला 87.3 टक्के चान्सेस आहेत. चेन्नई सुपर किंग्जला 72.7 टक्के संधी आहे. तर आरसीबीला सर्वाधिक कमी म्हणजे 39.3 टक्के शक्यता आहे.

चेन्नई सुपर किंग्ज

चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. त्यांनी 7 विजयासह 14 गुण मिळवलेत. त्यांचे नेट रनरेट हे (NRR +0.528) इतके आहे. ऋतुराजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सीएसकेला प्ले ऑफ गाठण्यासाठी चांगली संधी आहे. त्यांनी जर आरसीबीला मात दिली तर ते थेट प्ले ऑफमध्ये जातील.

जरी ते आरसीबीबरोबर हरले तरी त्यांचे आव्हान संपुष्टात येणार नाहीये. आरसीबीला प्ले ऑफ गाठण्यासाठी सीएसकेला नेट रनरेटमध्ये मागं टाकावं लागेल. लखनौनेही सामना जिंकला तरी नेट रनरेटच्या आधारे सीएसकेच प्ले ऑफमध्ये जाण्याची 72 टक्के शक्यता आहे.

सनराईजर्स हैदराबाद

सनराईजर्स हैदराबादला प्ले ऑफमध्ये जाण्याची सर्वाधिक जास्त संधी आहे. त्यांचे दोन सामने शिल्लक असून त्यातील एक सामना गमावला तरी त्यांना प्ले ऑफ गाठण्याची चांगली संधी आहे. जर त्यांनी दोन्ही सामने गमावले तर त्यांचे प्ले ऑफचे गणित हे नेट रनरेटवर येईल.

जर सीएसकेने आरसीबीला पराभूत केलं. अन् हैदराबादने दोन्ही सामने गमावले तर त्यांना आपलं नेट रनरेट हे लखनौ आणि दिल्लीपेक्षा चांगले ठेवावं लागणार आहे.

रॉयल चॅलेंजर बंगळुरू

प्ले ऑफच्या शर्यतीत सलग पाच सामने जिंकून आपलं आव्हान जिवंत ठेवणाऱ्या आरसीबीला 39 टक्के संधी आहे. आरसीबीने 13 सामन्यात 12 गुण मिळवले आहेत. त्यांचे नेट रनरेट (NRR +0.387) चांगले आहे.

आरसीबीला जर प्ले ऑफसाठी पात्र व्हायचं असेल तर त्यांना आधी चेन्नईचा पराभव करावा लागले. त्यानंतर ते 14 गुणांवर पोहचतील. यानंतर त्यांना नेट रनरेटच्या भरवश्यावर प्ले ऑफचे स्वप्न पाहता येईल. जर हैदराबादने आपले दोन्ही सामने गमावले तर आरसीबीला चांगली संधी आहे. याचबरोबर जर लखनौने त्यांचा शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकला तर आरसीबीचे गणित फिसकटू शकते.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT