IPL 2024 Playoffs Qualifier Eliminator Final Match Tickets Sakal
IPL

IPL 2024: क्वालिफायर अन् फायनल स्टेडियममध्ये जाऊन पाहायचेत? कसे आणि कधी करणार तिकीट बूक, जाणून घ्या

IPL 2024 Playoffs Tickets: आयपीएल 2024 प्लेऑफमधील सामन्यांना 22 मे पासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी बीसीसीआयने तिकीटांबद्दल मोठी घोषणा केली आहे.

Pranali Kodre

IPL 2024 Playoffs Tickets: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. या स्पर्धेतील साखळी सामने 19 मे रोजी संपणार आहेत. त्यानंतर पुढील आठवड्यात 21 मेपासून प्लेऑफला सुरुवात होणार आहे. दरम्यान, त्यापूर्वी बीसीसीआयने ऑनलाईन तिकीट विक्रीबद्दल मोठी घोषणा केली आहे.

आयपीएल 2024 प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर सामना 21 रोजी, तर एलिमिनेटर 22 मे रोजी होणार आहे. हे दोन्ही सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होतील. त्यानंतर 24 मे रोजी दुसरा क्वालिफायर, तर 26 मे रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. दुसरा क्वालिफायर आणि अंतिम सामना चेन्नईला होणार आहे.

दरम्यान, 14 मे रोजी संध्याकाळी प्लेऑफमधील दोन्ही क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्याची तिकीटे ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. मात्र 14 मे रोजी तिकीटे केवळ रुपे कार्ड धारकांसाठीच उपलब्ध असणार आहेत. त्यानंतर 15 मे पासून सर्वांसाठी ही तिकीटे उपलब्ध होतील.

तसेच 20 मे रोजी रुपे कार्ड वापरकर्त्यांसाठी अंतिम सामन्याची तिकीटे ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध होतील, तर २१ मेपासून सर्वांसाठी अंतिम सामन्याची तिकिट ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध होतील. ही सर्व तिकीटे दिलेल्या तारखेपासून संध्याकाळी ६ वाजल्यानंतर उपलब्ध असतील.

क्रिकेट चाहते सामन्यांची तिकिटे अधिकृत आयपीएल वेबसाईट, पेटीएम ऍप, पेटीएम इनसायडर ऍप आणि इनसायडर.इन यावर उपलब्ध असतील.

बीसीसीआयने अशीही माहिती दिली की प्लेऑफच्या सामन्यांसाठी अधिकृत तिकीट एजन्सी म्हणून पेटीएमची नियुक्ती करण्यात आली आहे.

आयपीएल प्लेऑफचे स्वरुप

दरम्यान, आयपीएल प्लेऑफमध्ये साखळी सामन्यानंतर पाँइंट्स टेबलमधील पहिले चार संघ प्रवेश करतात. पहिल्या दोन क्रमांकावर राहिलेल्या संघात पहिला क्वालिफायर सामना खेळला जातो. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतो, तर पराभूत होणाऱ्या संघाला आणखी एक संधी मिळते.

या पाँइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघांना एलिमिनेटर सामना खेळावा लागतो. या सामन्या जिंकणारा संघ दुसऱ्या क्वालिफायरसाठी पात्र ठरतो, तर पराभूत होणाऱ्या संघाचे आव्हान संपते.

दरम्यान, पहिल्या क्वालिफायरमधील पराभूत संघ आणि एलिमिनेटरमधील विजेता संघ यांच्यात दुसरा क्वालिफायर सामना खेळवला जातो, त्यात जो संघ विजेता ठरतो, तो पहिल्या क्वालिफायरमधील विजेत्या संघाविरुद्ध अंतिम सामना खेळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT