IPL 2024 Playoffs Schedule sakal
IPL

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

Kiran Mahanavar

IPL 2024 Playoffs Schedule : इंडियन प्रीमियर लीगचा २०२४ चा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्लेऑफचे चित्रही स्पष्ट झाले आहे. चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करून प्लेऑफमध्ये पोहोचणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा चौथा संघ ठरला आहे. बेंगळुरूने चेन्नईवर 27 धावांनी विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी आधीच प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता.

चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, लखनौ सुपर जायंट्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आयपीएल 2024 मधून बाहेर गेले आहेत.

प्लेऑफचे सामने अद्याप निश्चित नाहीत...

प्लेऑफचे संघ मिळाले असले तरी कोणत्या संघाचा कोणाशी सामना होणार हे अद्याप स्पष्ट नाही. खरं तर, कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, परंतु दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघात अजूनही बदल होऊ शकतो. राजस्थान रॉयल्स 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर सनरायझर्स हैदराबादला (तिसऱ्या स्थानावर) 17 गुण गाठण्याची संधी आहे. राजस्थानने शेवटचा सामना हरला तर हैदराबाद जिंकल्यास बदल होईल.

आरसीबीने केला चमत्कार, धोनीचे स्वप्न भंगले

तथापि, एक गोष्ट निश्चित झाली आहे की आरसीबी चौथ्या क्रमांकावर राहील. त्याचे 14 सामन्यांत 14 गुण आहेत. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावून 218 धावा केल्या. प्रत्युत्तरात धोनीच्या संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी 201 धावा करायच्या होत्या, तर विजयासाठी 219 धावा करायच्या होत्या.

यलो आर्मीला मात्र 191 धावांपर्यंतच मजल मारता आली. अशाप्रकारे धोनीचा संघ आयपीएलमधून बाहेर गेला आहे. आणि धोनी यापुढे आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही अशी शक्यता आहे. यावेळी संघाला चॅम्पियन बनवून तो निवृत्त होईल, असे मानले जात होते, मात्र त्याचा संघ प्लेऑफपर्यंत पोहोचू शकला नाही.

आयपीएल 2024 प्लेऑफ शेड्यूल आणि ठिकाण- (IPL 2024 Playoffs Schedule)

क्वालिफायर - 1 : अहमदाबाद येथे 21 मे (कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पॉइंट टेबल मधील दुसरा संघ)

एलिमिनेटर : 22 मे अहमदाबादमध्ये (पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या संघाविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)

क्वालिफायर - 2 : चेन्नई येथे 24 मे (क्वालिफायर-1 मधील पराभूत आणि एलिमिनेटरच्या विजेत्या संघामध्ये होईल)

फायनल : चेन्नई येथे 26 मे (क्वालिफायर-1 आणि क्वालिफायर-2 चे विजेत्या संघामध्ये अंतिम सामना होईल)

आयपीएल 2024 प्लेऑफ सामने संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होतील आणि भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील. आणि चाहते त्याच्या मोबाइलवर लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंदही घेऊ शकतात, यासाठी ते जिओ सिनेमा ॲपवर पाहू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT