IPL 2024 Playoffs Schedule Details sakal
IPL

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही राखीव दिवस; पावसामुळे सामना रद्द झाला तर कसा लागणार निकाल?

Kiran Mahanavar

IPL 2024 Playoffs Schedule Details: आयपीएल 2024 च्या प्लेऑफचे चार संघ निश्चित झाले आहेत. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद पहिला क्वालिफायर मंगळवार, 21 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. तर राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एलिमिनेटर सामना त्याच मैदानावर बुधवारी, 22 मे रोजी खेळला जाईल.

पहिला क्वालिफायर जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये जाईल, तर पराभूत झालेल्या संघाचा सामना दुसऱ्या क्वालिफायरमध्ये जिंकणाऱ्या संघाशी एलिमिनेटरमध्ये होईल.

पण आयपीएल 2024 च्या लीग टप्प्यातील शेवटचे काही सामने पावसामुळे वाहून गेल्यानंतर चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की प्लेऑफमध्ये पाऊस पडला तर कोणता संघ पुढे जाईल... कारण आयपीएल 2024 फायनल वगळता कोणत्याही सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला नाही.

होय, जर पावसाने क्वालिफायर-1, एलिमिनेटर आणि क्वालिफायर-2 मध्ये व्यत्यय आणला, तर पंचांकडे प्रत्येकी किमान 5 षटकांचा सामना आयोजित करण्यासाठी अतिरिक्त 120 मिनिटे असतील. पावसामुळे 5 षटकेही खेळता आली नाहीत तर पंच सुपर ओव्हरद्वारे निकाल देण्याचा प्रयत्न करतील. सुपर ओव्हर शक्य नसले तरी गुणतालिकेच्या क्रमवारीच्या आधारे निर्णय घेतला जाईल.

आयपीएल 2024 फायनलच्या राखीव दिवसाबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही, परंतु मागील हंगामात चेन्नई सुपर किंग्स आणि जीटी यांच्यातील अंतिम सामना राखीव दिवशी खेळला गेला होता. अशा परिस्थितीत या हंगामातही अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस असेल.

चेन्नईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्याच्या राखीव दिवसात पावसाने व्यत्यय आणला तर पंच प्रत्येकी किमान 5 षटके खेळण्याचा प्रयत्न करतील. हे शक्य नसल्यास पंच सुपर ओव्हरमधून सामन्याचा निकाल लावण्यासाठी प्रतीक्षा करतील. पावसामुळे सुपर ओव्हर शक्य नसल्यास पॉइंट टेबल रँकिंगच्या आधारे निर्णय घेतला जाईल.

मात्र, 21 आणि 22 मे रोजी अहमदाबादमध्ये पावसाचा कोणताही अंदाज नाही. Accuweather नुसार, 24 मे रोजी होणाऱ्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये चेन्नईमध्ये पावसाची 5 टक्के शक्यता आहे, तर 26 मे रोजी होणाऱ्या फायनलमध्ये पावसाची 4 टक्के शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT