IPL 2024 Points Table Update : आयपीएल 2024 मध्ये दररोज एकापेक्षा एक भारी सामने पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्लेऑफची शर्यतही अतिशय रोमांचक होत आहे. काल आयपीएल 2024 चा 31 वा सामना खेळला गेला. ज्या सामन्यावर सुरुवातीपासून कोलकाता नाईट रायडर्स संघाचे वर्चस्व होते... पण राजस्थानचा स्फोटक फलंदाज जोस बटलरने वन मॅन आर्मीप्रमाणे एकाकी झुंज दिली. आणि अखेरीस संघाला विजय मिळवून देण्यात यश मिळवले.
या सामन्यात रॉयल्सच्या विजयामुळे ते प्लेऑफमध्ये खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राजस्थानने या हंगामात आतापर्यंत 7 सामने खेळले असून त्यापैकी 6 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे असे 4 संघ आहेत ज्यांच्यासाठी प्लेऑफची शर्यत जवळपास संपली आहे.
आयपीएल 2024 चे पॉइंट टेबल प्रत्येक सामन्यानंतर बदलत आहे. टूर्नामेंट अशा टप्प्यावर पोहोचली आहे जिथे प्रत्येक सामना एकतर संघाला बाहेर नेऊ शकतो किंवा प्लेऑफसाठी तिकीट मिळवू शकतो.
राजस्थानविरुद्ध पराभूत झाल्यानंतर पण कोलकाता संघ मजबूत स्थितीत दिसत आहे. केकेआरने या मोसमात आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत, त्यापैकी 4 सामने जिंकले आहेत. या सामन्यापूर्वीही केकेआर दुसऱ्या स्थानावर होता आणि अजूनही दुसऱ्या स्थानावर आहे, पण आता त्याच्या बॅगेत 2 पराभव आहेत.
मात्र, गुणतालिकेत मजबूत स्थान असल्याने कोलकाता प्लेऑफ खेळणार हे निश्चित मानले जात आहे. याशिवाय चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादही मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे. पण असे चार संघ आहेत जे या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत.
आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांच्या आधारे असा अंदाज वर्तवला जात आहे की 4 संघांचे प्लेऑफमधून बाहेर पडणे जवळपास निश्चित आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नाव प्रथम येते, ज्याने 7 सामने खेळले आहेत, परंतु केवळ एकच सामना जिंकू शकला आहे.
या यादीत दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सचाही समावेश आहे. दोन्ही संघांना 6 पैकी फक्त 2 सामने जिंकता आले आहेत. याशिवाय पंजाब किंग्जचे प्लेऑफमधून बाहेर पडणेही निश्चित दिसते. पंजाबला 6 पैकी फक्त 2 सामने जिंकता आले आहेत.
प्लेऑफमध्ये सहज पोहोचण्यासाठी कोणत्याही संघाला 8 सामने जिंकावे लागतील. प्रत्येक संघाला 14 साखळी सामने खेळायचे आहेत. जर आपण आरसीबीबद्दल बोललो तर बेंगळुरूला आणखी 7 सामने खेळायचे आहेत. जर बेंगळुरूला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्याला सर्व 7 सामने जिंकावे लागतील, जे इतके सोपे नसेल. त्याचप्रमाणे उर्वरित 3 संघांसाठीही हा मार्ग खडतर दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.