RCB vs CSK | IPL Match  Sakal
IPL

RCB vs CSK सामन्याची क्रेज! लग्न सोडून नवरदेव भर मांडवात बघत बसला मॅच, Video व्हायरल

Viral Video: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स संघात शनिवारी महत्त्वाचा सामना पार पडला हा सामना पाहण्याचा मोह एका नवरदेवालाही आवरता आला नाही. त्याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

RCB vs CSK, Viral Video: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेतील 68 वा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात झाला. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. या सामन्यात बंगळुरूने 27 धावांनी विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, या सामन्यात बेंगळुरूला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी 18 धावांनी विजय मिळवणे गरजेचे होते. तसेच चेन्नईला प्लेऑफसाठी विजय किंवा 17 धावांहून कमीच्या फरकाने पराभव स्विकारावा लागणार होता. पण अखेर बेंगळुरूने 27 धावांनी विजय मिळवल्याने त्यांनी प्लेऑफचं तिकीट मिळवलं.

एकूण प्लेऑफच्यादृष्टीने महत्त्वाचा असणारा हा सामना बराच चर्चेत राहिला. या सामन्याला मोठा प्रेक्षकवर्गही मिळाला. विशेष म्हणजे सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यावरून या सामन्याची क्रेज किती होती, हे लक्षात येते.

हा व्हायरल होत असेलला व्हिडिओ एका लग्नातील असून यात दिसते की लग्नाच्या ठिकाणी प्रोजेक्टर लावलेला असून त्यावर बंगळुरू आणि चेन्नई यांच्यातील सामना लाईव्ह चालू आहे. या दरम्यान लग्नासाठी आलेले काही पाहुणे सामन्याचा आनंद घेताना दिसत आहे.

यावेळी हा सामना पाहण्याचा मोह अगदी नवरदेवालाही आवरता आला नाही, त्यामुळे तोही काही क्षण सामना पाहण्यासाठी आला आणि नंतर पुन्हा मांडवात गेला. दरम्यान, हा व्हि़डिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

बंगळुरूचा विजय

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर चेन्नईसमोर बंगळुरूने 219 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला 20 षटकात 7 बाद 191 धावाच करता आल्या. चेन्नईकडून रचिन रविंद्रने 61 धावा, तर रविंद्र जडेजाने 42 धावांची खेळी केली. बंगळुरूकडून गोलंदाजी करताना यश दयालने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी बेंगळुरूकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक 54 धावा केल्या, तसेच विराट कोहलीने 47 आणि रजत पाटिदारने 41 धावांची खेळी केली. त्यामुळे बंगळुरूने 20 षटकात 5 बाद 218 धावा केल्या होत्या. चेन्नईकडून गोलंदाजीत शार्दुल ठाकूरने 2 विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT