IPL 2024 | RCB  Sakal
IPL

IPL 2024: शानदार, जबरदस्त, जिंदाबाद...! सलग 6 सामने हरलेल्या RCB ने अफलातून कमबॅक करत गाठली प्लेऑफ

IPL 2024 RCB vs CSK: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल 2024 च्या अखेरच्या साखळी सामन्यात पराभूत करत प्लेऑफमधील प्रवेश पक्का केला आहे.

Pranali Kodre

IPL 2024 RCB vs CSK: कमबॅक करणं म्हणजे काय हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२४ मध्ये करून दाखवलं. ज्या बंगळुरू संघासाठी प्लेऑफ स्वप्न वाटत होतं. ते प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यताही १ टक्का होती, सुरुवातीच्या ८ सामन्यात ७ पराभव संघानं पाहिले होते. यातले ६ सामने ते सलग हरले होते. तब्बल एक महिना त्यांनी विजयच पाहिला नव्हता.

पण त्याच संघानं स्पर्धेत उलटफेर केला आणि नंतर सलग ६ सामने जिंकत प्लेऑफचं तिकीट मिळवलं. ज्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पराभव स्विकारत आयपीएल २०२४ ची सुरुवात केली होती, त्याच चेन्नईला शेवटच्या साखळी सामन्यात पराभूत करत बंगळुरूने प्लेऑफ गाठली.

बंगळुरूला प्लेऑफसाठी चेन्नईविरुद्ध १८ धावांनी विजय गरजेचाच होता. त्यातच पावसाची शक्यता बंगळुरूमध्ये वर्तवण्यात आली होती. त्यामुळे बंगळुरूच्या हातून ही संधी सुटणार असंच वाटत होतं. परंतु, बंगळुरूचा संघ एकमेव संधी साधण्यासाठी एक झाला अन् चेन्नईला २७ धावांनी पराभूत करत प्लेऑफमधील स्थान निश्चित केला.

चेन्नईचा कर्णधार ऋतुराजने टॉस जिंकत पहिली बॉलिंग घेतली. पण बेंगळुरूसाठी विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसनं आक्रमक सुरुवात केली. तरी पावसाचा मध्ये व्यत्यय आला, पण त्याचा परिणाम त्यांच्या बॅटिंगवर झाला नाही. विराट ४७ धावांवर बाद झाला, पण डू प्लेसिसने फिफ्टी ठोकली, तो दुर्दैवीरित्या रनआऊट झाला.

हे दोघं बाद झाल्यानंतरही धावगती कमी होणार नाही, याची काळजी रजत पाटिदार, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक अन् ग्लेन मॅक्सवेल यांनी घेतली. बंगळुरूच्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे २० ओव्हरमध्ये ५ बाद २१८ धावा झाल्या. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरनं २ विकेट्स घेतल्या खऱ्या पण त्यानं तब्बल ६१ धावा खर्च केल्या. या सामन्यात जडेजाची गोलंदाजीही महागडी ठरली.

त्यातच २१९ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या चेन्नईला पहिल्याच चेंडूवर तगडा झटका बसला. कर्णधार ऋतुराज गायकवाड पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पाठोपाठ डॅरिल मिचेलनंही विकेट गमावली.

पण यानंतर रचिन रविंद्र आणि अजिंक्य रहाणने यांनी चेन्नईच्या आशा फुलवल्या होत्या. त्यांची भागीदारी रंगली होती. पण रहाणेला लॉकी फर्ग्युसननं बाद केलं अन् चेन्नईने नियमित अंतरानं विकेट्स गमावायला सुरुवात केली. तरी रचिन रविंद्रने फिफ्टी ठोकत चांगली झुंज दिलेली. पण तो रनआऊट झाला. त्याची विकेट या सामन्यातील टर्निंग पाँइट ठरली. त्याच्या विकेटसह चेन्नईची सामन्यावरील पकड ढिली झाली.

नंतर शिवम दुबेही स्वस्तात माघारी परतला. सँटेनरला अफलातून झेल फाफ डू प्लेसिसने घेतला. त्याचा हा झेल आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम झेलांपैकी एक ठरला.

नंतर मात्र चेन्नई विजयापेक्षा प्लेऑफसाठी प्रयत्न करताना दिसले, शेवटी धोनी आणि जडेजाने सर्वतोपरी प्रयत्न केले की चेन्नई किमान २०१ धावांपर्यंत पोहचेल. पण शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर धोनीने षटकार ठोकल्यानंतर पुढच्या चेंडूवर तो आऊट झाला अन् त्यानंतरच्या ५ चेंडूत चेन्नईला फक्त १ धाव घेता आली. शेवटच्या ओव्हरमध्ये यश दयालने शानदार गोलंदाजी केली.

अखेर चेन्नईला पराभवाबरोबर या स्पर्धेतील प्रवासही थांबवायला लागलाय. आता हा सामना धोनीच्या कारकिर्दितीलही शेवटचा सामना ठरलाय का, याचं उत्तरही लवकरच मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा: हर्षित माहीमकरला दुहेरी मुकुटाची संधी, १७ वर्षांखालील मुले व पुरुष विभागाच्या अंतिम फेरीत

राज्यात महायुती सत्तेवर येताच संरक्षणासाठी 'यूपी'चे सूत्र लागू होणार; कोल्हापुरात योगी आदित्यनाथ यांची घोषणा

Narendra Modi : नायजेरियाबरोबरील भागीदारी महत्त्वाची मोदींचे प्रतिपादन; तीन देशांच्या दौऱ्याला सुरुवात

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

SCROLL FOR NEXT