rishabh pant sakal
IPL

IPL 2024 : ऋषभ पंतचा मोठा कारनामा! दिल्लीसाठी आजपर्यंत कोणालाच न जमलेला केला रेकॉर्ड

इंडियन प्रीमियर लीगचा २६ वा सामना लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीने लखनौचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

सकाळ डिजिटल टीम

IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीगचा २६ वा सामना लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीने लखनौचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

पंतने दिल्ली कॅपिटल्ससाठी या सामन्यादरम्यान ३००० धावा पूर्ण केल्या आहेत. लखनौविरुद्धच्या सामन्यापूर्वी रिषभला हा विक्रम पूर्ण करण्यासाठी फक्त ९ धावांची गरज होती. या सामन्यात त्याने २४ बाॅलमध्ये ४१ धावा काढत हा विक्रम पूर्ण केला आहे. त्याने यावेळी खेळताना ४ फोर आणि दोन सिक्स मारले. दिल्लीसाठी ३००० धावा पूर्ण करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू बनला आहे.

रिषभ पंतने आयपीएलमध्ये दिल्लीकडून २०१६ साली पदार्पण केले होते. मात्र २०२२ च्या अखेरीस कार अपघातामुळे झालेल्या दुखापतींमुळे त्याला २०२३ ची आयपीएल खेळता आली नव्हती. त्यानंतर २०२४ च्या आयपीएलमध्ये त्याने जोरदार कमबॅक केले आहे. त्याने आयपीएलच्या १७ व्या हंगामात ६ सामन्यात १५७.७२ च्या स्ट्राइक रेटने १९६ धावा केल्या आहेत.

दिल्लीसाठी सर्वात जास्त धावा करण्याच्या यादीत डेविड वाॅर्नर दूसऱ्या स्थानावर आहे. त्याने ८७ सामन्यात २५४९ धावा केल्या आहेत, तर कर्णधार रिषभ पंतने १०४ सामन्यांत ३०३२ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एका शतकाचा तर १७ अर्धशतकांचा समावेश आहे.

दिल्लीसाठी सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत पाचव्या क्रमांकावर शिखर धवन आहे, त्याने ६३ सामन्यात २०६६ धावा केल्या आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर विरेंद्र सेहवाग आहे, त्याने ७९ सामन्यांत २१७४ रन्स केल्या आहेत. या यादीत तृतीय क्रमांकावर आहे श्रेयस अय्यर, त्याने ८७ सामन्यांत २३७५ धावा केल्या आहेत.

दिल्लीचा विजय

या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने टाॅस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दिल्लीसमोर १६७ धावांचे लक्ष्य ठेवले. लखनौकडून आयुष बडोनीने ५५, केएल राहुलने ३९ धावा केल्या. सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली. कुलदीप यादवने ३, तर खलील अहमदने २ विकेट्स घेतल्या आणि इशांत आणि मुकेश कुमारने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीने १८.१ षटकात हे आव्हान पूर्ण केले. जेक-फ्रेझर मॅकगर्कने ५५, रिषभ पंतने ४१ तर पृथ्वी शाॅने ३२ धावा केल्या. तर लखनौच्या गोलंदाजीमध्ये रवि बिश्नोईने २स तर नविन आणि यशने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.

दिल्ली कॅपिटल्स आपल्या या दूसऱ्या विजयानंतर गुणतालिकेत नवव्या स्थानावर पोहोचला आहे. दिल्ली आपला पुढचा सामना १७ एप्रिलला गुजरात टायटन्सविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT