RCB equation for IPL 2024 playoffs News Marathi sakal
IPL

RCB equation for IPL 2024 playoffs : नाराज होऊ नका पोरांनो... RCB अजूनही जाऊ शकते प्ले-ऑफमध्ये; जाणून घ्या गणित

IPL 2024 Royal Challengers Bengaluru Playoff Equation : आयपीएल 2024 मधील 30 वा सामना आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळला गेला. जो सनरायझर्स हैदराबादने 25 धावांनी जिंकला.

Kiran Mahanavar

RCB equation for IPL 2024 playoffs : आयपीएल 2024 मधील 30 वा सामना आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळला गेला. जो सनरायझर्स हैदराबादने 25 धावांनी जिंकला. आरसीबीचा या हंगामातला हा सहावा पराभव आहे. त्यामुळे ज्यांच्या चाहत्यांना असे वाटते की आता आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली. पण आरसीबीच्या चाहत्यांनो आशा सोडू नका. आरसीबी अजून पण प्लेऑफच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही.

आरसीबीच्या संघाला एकदाही आयपीएलचे जेतेपद जिंकता आलेले नाही. यावेळी संघाचे नावही बदलण्यात आले. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ऐवजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असे नाव बदलण्यात आले, परंतु नाव बदलल्यानंतरही संघाच्या नशिबावर आणि कामगिरीवर कोणताही परिणाम झाला नाही.

गेल्या अनेक हंगामांपासून हा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी धडपडताना दिसत आहे. यावेळीही असेच काहीसे होताना दिसत आहे. मात्र 6 पराभवानंतरही हा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला नाही.

आता प्रश्न असा आहे की, जर आरसीबी संघाला प्ले ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर काय करावे लागेल. पहिली गोष्ट म्हणजे प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी आरसीबीला त्यांचे उर्वरित सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील आणि सध्या टॉप 4 मध्ये असलेल्या संघांच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. तरच आरसीबीसाठी काही समीकरण तयार होऊ शकेल.

प्लेऑफमध्ये जाण्यासाठी कोणत्याही संघाचे किमान 16 गुण असणे आवश्यक आहे. आणि मोठी गोष्ट म्हणजे 16 गुण मिळवूनही संघ प्लेऑफमध्ये जाईल हे निश्चित नाही. यासाठी त्याचा नेट रनरेटही चांगला असणे महत्त्वाचे आहे.

आरसीबीचे सध्या 2 गुण आहेत आणि 7 सामने बाकी आहेत. जर संघाने इथून सातही सामने जिंकले तर 16 गुण होतील. म्हणजे अशा प्रकारे प्लेऑफमध्ये प्रवेश करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

दारूच्या नशेतच कपूर परिवाराला पहिल्यांदा भेटली संजय कपूरची बायको ; म्हणाली "ड्रिंक्स करताना त्याने प्रपोज केलं"

SCROLL FOR NEXT