Punjab Kings Sakal
IPL

IPL 2024 RR vs PBKS: राजस्थानचा सलग चौथा पराभव! कर्णधार सॅम करनच्या संयमी खेळीनं पंजाबला मिळवून दिला विजय

IPL 2024 RR vs PBKS Scorecard Updates: आयपीएल 2024 स्पर्धेतील 65व्या सामन्यात पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सला गुवाहाटीत पराभवाचा धक्का दिला.

Pranali Kodre

Rajasthan Royals vs Punjab Kings:

आयपीएल 2024 स्पर्धेतील 65 वा सामना बुधवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात गुवाहाटीला झाला. या सामन्यात पंजाब किंग्सने पाच विकेट्सने विजय मिळवला. हा पंजाबचा पाचवा विजय ठरला आहे. त्यामुळे आता त्यांचे 10 पाँइंट्स झाले आहेत.

दरम्यान, पंजाबचे स्पर्धेतील आव्हान संपले असले, तरी त्यांनी आता शेवटच्या क्रमांकावरून 9 व्या क्रमांकावर आले आहेत. त्यामुळे आता शेवटच्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स संघ घसरला आहे.

दरम्यान, राजस्थानने प्लेऑफमधील स्थान पक्के केले असले, तरी त्यांना सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आता पहिल्या दोन क्रमांकावर राहण्यासाठी त्यांना अखेरच्या साखळी सामन्यात जोर लावावा लागणार आहे.

दरम्यान, बुधवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 144 धावाच केल्या. त्यामुळे पंजाबसमोर आता विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग पंजाबने 18.5 षटकात 5 विकेट्स गमावत पूर्ण केला.

IPL 2024 RR vs PBKS Live Score: राजस्थानचा सलग चौथा पराभव! कर्णधार सॅम करनच्या संयमी खेळीनं पंजाबला मिळवून दिला विजय

पंजाबला अखेरच्या दोन षटकात 15 धावांची गरज होती. यावेळी 19 व्या षटकातच सॅम करन आणि आशुतोष शर्मा यांनी या 15 धावा पूर्ण करत पंजाबचा विजय निश्चित केला.

19 व्या षटकात दोघांनी प्रत्येकी 1 षटकार ठोकला. 19 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर आशुतोष शर्माने विजयी धाव घेत पंजाबला स्पर्धेतील पाचवा विजय मिळवून दिला. पंजाबकडून सॅम करन 41 चेंडूत 63 धावा करून नाबाद राहिला, तर आशुतोष 17 धावांवर नाबाद राहिला.

राजस्थानकडून आवेश खान आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर ट्रेंट बोल्टने 1 विकेट घेतली.

IPL 2024 RR vs PBKS Live Score: सॅम करनचे झुंजार अर्धशतक

एका बाजूने विकेट गेलेल्या असतानाही पंजाबचा कर्णधार सॅम करनने संयमी खेळ करत डाव पुढे नेण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने 38 चेंडूत अर्धशतक साजरे केले. त्याच्या या अर्धशतकामुळे पंजाबच्या विजयासाठी आशा कायम आहेत.

IPL 2024 RR vs PBKS Live Score: पंजाबचा अर्धा संघ परतला माघारी! चहलने तोडली जितेश शर्मा-सॅम करनची पार्टनरशीप

बेअरस्टो बाद झाल्यानंतर पंजाबचा डाव सॅम करनने जितेश शर्माला साथीला घेत सांभाळला होता. त्यांच्यात अर्धशतकी भागीदारीही झाली. त्यामुळे पंजाबने 100 धावांचा टप्पा ओलांडला होता.

परंतु, त्यांची जोडी युजवेंद्र चहलने तोडली. त्याने जितेशला 22 धावांवर बाद केले. जितेशचा झेल रियान परागने पकडला. त्यामुळे आता धावांचा पाठलाग करताना पंजाबचीही दमछाक होत असल्याचे दिसले.

IPL 2024 RR vs PBKS Live Score: चहलने बेअरस्टोला अडकवलं फिरकीच्या जाळ्यात

पाचव्या षटकात दोन विकेट्स गमावल्यानंतर पंजाबचा डाव पुढे नेण्याचा बेअरस्टो आणि कर्णधार सॅम करनने प्रयत्न केला. परंतु, बेअरस्टो धोकादायक ठरण्यापूर्वीच युजवेंद्र चहलने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवलं.

त्यामुळे बेअरस्टो रियान परागकडे झेल देत 14 धावांवर माघारी परतला. दरम्यान, बेअरस्टोचा हा आयपीएल 2024 मधील अखेरचा सामना आहे. या सामन्यानंतर तो इंग्लंडला परतणार आहे.

IPL 2024 RR vs PBKS Live Score: आवेशने एकाच ओव्हरमध्ये पंजाबला दिले दुहेरी धक्के! धोकादायक रुसो पाठोपाठ शशांक सिंगही परतला माघारी

पंजाबकडून 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी प्रभसिमरन सिंग आणि जॉनी बेअरस्टो उतरले. परंतु, पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने प्रभसिमरन सिंगला बाद केले. तो 6 धावांवरच बाद झाला.

त्यानंतर रिली रुसोने आक्रमक खेळ करत बेअरस्टोसह पंजाबच डाव पुढे नेला. पण रुसोचा अडथळा आवेश खानने पाचव्या षटकात दूर केला. त्याचा झेल यशस्वी जैस्वालने घेतला. तो बाद झाल्यानंतर याच षटकात शशांक सिंगला शुन्यावरच आवेशने पायचीत करत माघारी धाडले. रुसो 22 धावांवर बाद झाला.

IPL 2024 RR vs PBKS Live Score: पंजाबचा तिखट मारा, पण परागने दिली एकाकी झुंज! राजस्थानचे पंजाबसमोर 145 धावांचे लक्ष्य

पॉवेल बाद झाल्यानंतर डोनोवन फरेराही फार काळ टीकू शकला नाही. त्याला 8 धावांवर हर्षल पटेलने बाद केले. पण एका बाजूने सातत्याने विकेट जात असतानाही रियान परागने एकाकी झुंज दिली. त्याने एक बाजू चांगली सांभाळली होती.

परंतु त्याला अखेर शेवटच्या षटकात त्याला हर्षल पटेलने पायचीत केले. तो 34 चेंडूत 6 चौकार मारत 48 धावांवर बाद झाला. शेवटच्या चेंडूवर ट्रेंट बोल्टही 12 धावांवर धावबाद झाला. अखेर राजस्थानला 20 षटकात 9 बाद 144 धावाच करता आल्या. त्यामुळे पंजाबसमोर आता विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य असेल.

पंजाबकडून गोलंदाजीत सॅम करन, हर्षल पटेल, राहुल चाहर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच अर्शदीप सिंग आणि नॅथन एलिस यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

IPL 2024 RR vs PBKS Live Score: रोवमन पॉवेलही प्रभाव पाडण्यात अपयशी, राजस्थानच्या अडचणी वाढल्या

नियमित अंतराने विकेट्स गमावल्यानंतर रोवमन पॉवेलकडून राजस्थानला अपेक्षा होत्या. परंतु त्याचाही अडथळा राहुल चारहने 15 व्या षटकात आपल्याच गोलंदाजीवर झेल घेत दूर केला. पॉवेल 4 धावांवर बाद झाला.

IPL 2024 RR vs PBKS Live Score: राजस्थानचा निम्मा संघ गारद! ध्रुव जुरेलही गोल्डन डकवर आऊट

पहिल्या तीन विकेट्स गमावल्यानंतर राजस्थानचा डाव रियान पराग आणि आर अश्विन यांनी सांभाळला होता. त्यांनी अर्धशतकी भागीदारी केलेली. पण ही भागीदारी 13 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अर्शदीप सिंगने तोडली.

त्याने अश्विनला शशांक सिंगच्या हातून 28 धावांवर झेल बाद केले. त्यानंतर पुढच्यात षटकात पहिलाच चेंडू खेळणाऱ्या ध्रुव जुरेलला सॅम करनने माघारी धाडले. त्यामुळे तो गोल्डन डक झाला.

IPL 2024 RR vs PBKS Live Score: राजस्थानचा दुसरा सलामीवीरही परतला माघारी

सॅमसननंतर लगेचच 8 व्या षटकात सलामीवीर कोहलर-कॅडमोरनेही विकेट गमावली. त्याला 18 धावांवर राहुल चाहरने बाद केले. त्याचा झेल जितेश शर्माने घेतला.

IPL 2024 RR vs PBKS Live Score: राजस्थानला दुसरा धक्का! जैस्वाल पाठोपाठ संजू सॅमसनही स्वस्तात बाद

जैस्वाल बाद झाल्यानंतर संजू सॅमसनने कोहलर-कॅडमोरने राजस्थानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, सॅमसनला 7 व्या षटकात 18 धावांवर नॅथन एलिसने बाद केले. सॅमसनचा झेल राहुल चाहरने घेतला.

IPL 2024 RR vs PBKS Live Score: राजस्थानला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का! सॅम करनने उडवला जैस्वालचा त्रिफळा

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जैस्वाल आणि टॉम कोहलर-कॅडमोर यांनी डावाची सुरुवात केली. मात्र पहिल्याच षटकात पंजाबचा कर्णधार सॅम करनने राजस्थानला मोठा धक्का दिला. त्याने चौथ्या चेंडूवर जैस्वालला 4 धावांवर त्रिफळाचीत केले.

IPL 2024 RR vs PBKS Live Score: जाणून घ्या पंजाब-राजस्थानचे प्लेइंग-11

पंजाब किंग्स: प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, रिली रुसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम करन (कर्णधार), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, नॅथन एलिस, राहुल चाहर, अर्शदीप सिंग

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - तनय त्यागराजन, ऋषी धवन, विद्वत कवेरप्पा, आशुतोष शर्मा, हरप्रीत सिंग भाटिया

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युझवेंद्र चहल

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - नांद्रे बर्गर, तनुष कोटियन, केशव महाराज, कुलदीप सेन, डोनोवन फरेरा

IPL 2024 RR vs PBKS Live Score: संजू सॅमसनने जिंकला टॉस! राजस्थान-पंजाबने प्लेइंग-11 मध्ये केले मोठे बदल

आयपीएल 2024 स्पर्धेतील 65 वा सामना बुधवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात गुवाहाटीला होत आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, या सामन्यापूर्वी दोन्ही संघातील काही खेळाडू मायदेशी परतल्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल झाला आहे. राजस्थानचा सलामीवीर जॉस बटलर इंग्लंडला परतल आहे.

त्यामुळे राजस्थानने टॉम कोहलर-कॅडमोरला संधी दिली आहे. तसेच सॅमसनने सांगितले सध्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीनच परदेशी खेळाडू असल्याने डोनोव्हन फरेराला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संधी दिली जाऊ शकते.

तसेच पंजाबनेही कागिसो रबाडा दुखापतीमुळे बाहेर झाल्यानंतर नॅथन एलिसला संधी दिली असून हरप्रीत ब्रारलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडले आहे.

Rajasthan Royals vs Punjab Kings: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 65 वा सामना बुधवारी (15 मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होणार आहे. हा सामना राजस्थानने घरचं मैदान म्हणून स्वीकारलेल्या बरसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना होतोय.

दरम्यान, या सामन्यापूर्वीच राजस्थानचे प्लेऑफमधील स्थान पक्के झाले आहे, तर पंजाब किंग्सचे आव्हान संपले आहे. त्यामुळे या सामन्याचा तसा फार परिणाम स्पर्धेवर होणार नसला, तरी राजस्थान पहिल्या दोन स्थानांवर राहण्यासाठी या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल, तर पंजाबही आव्हान संपले असले, तरी स्पर्धेची अखेर गोड करण्यासाठी प्रयत्नशील असतील.

याबरोबरच राजस्थानला गेल्या तीन सामन्यात, तर पंजाबला गेल्या दोन सामन्याच पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ विजयी मार्गावर परतण्यासाठीही उत्सुक असतील. याशिवाय दोन्ही संघातील इंग्लंडचे खेळाडू मायदेशी परतले आहेत. त्यामुळे या दोन्ही संघात बदल होणार हे निश्चित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT