RR vs PBKS Sakal
IPL

RR vs PBKS: पंजाबने आव्हान संपल्यानंतरही जाता जाता केली राजस्थानची गोची

IPL 2024, RR vs PBKS: पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सला आयपीएलच्या 65 व्या सामना पराभवाचा धक्का दिला आहे.

Pranali Kodre

IPL 2024, RR vs PBKS: आयपीएल 2024 स्पर्धेची अखेर जसजशी जवळ येत आहे, तशी प्लेऑफ शर्यतही चुरशीची होत आहे. या प्लेऑफच्या शर्यतीत सुरुवातीला राजस्थान रॉयल्सने चांगलाच वेग पकडलेला. त्यांच्या तुलनेत अनेक संघ बरेच पिछाडीवर होते. पण आयपीएलचा दुसरा टप्पा जसा चालू झाला, तसा राजस्थानच्या वेगाला ब्रेक लागला.

पहिल्या 9 सामन्यात फक्त एक पराभव स्विकारणाऱ्या राजस्थानने नंतरच्या चारही सामन्यात पराभव स्विकारला. त्यांना सलग चौथ्या पराभवाची चव चाखायला लावली ती आव्हान संपलेल्या पंजाब किंग्सनं. पंजाबचं या स्पर्धेतील आव्हान आठव्या पराभवाबरोबरच संपलेलं, पण तरी जाता जाता पंजाबने राजस्थानला मात्र टेंशन दिलंय.

आयपीएलच्या 65 व्या सामन्यात पंजाबने राजस्थानला 5 विकेट्सने पराभूत केलं. त्यामुळे आता राजस्थान 16 पाँइंट्सवरच राहिलेत. त्यांचं प्लेऑफमधील स्थान पक्के असलं, तरी मात्र आता त्यांना पहिल्या दोन क्रमांकावरच कायम राहण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.

त्यातच त्यांचा शेवटचा साखळी सामना पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध आहे. त्यामुळे आता राजस्थान विजयी मार्गावर परतायचं कसं या विचारात असेल. कारण आता पहिल्या दोन क्रमांकावर जाण्याची संधी इतर संघांनाही असणार आहे.

सामन्याबद्दल सांगायचं झालं तर गुवाहाटीत झालेल्या या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली होती. परंतु, राजस्थानने पहिल्याच ओव्हरमध्ये यशस्वी जैस्वालची विकेट गमावली.

पहिल्याच षटकात मिळालेली लय पंजाबच्या गोलंदाजांनी शेवटपर्यंत कायम ठेवली. त्यांनी राजस्थानचे फलंदाज वरचढ ठरणार नाहीत, याची काळजी शेवटपर्यंत घेतली. तरी राजस्थानकडून एकट्या रियान परागनं घरच्या मैदानावर खेळत एकाकी झुंज दिली. त्याला आर अश्विनने बरी साथ दिली. पण हे दोघे सोडले तर राजस्थानच्या एकाही फलंदाजाला 20 धावांचा टप्पाही पार करता आला नाही.

पंजाबचा कर्णधार सॅम करन, राहुल चाहर, हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स, तर नॅथन एलिस आणि अर्शदीप सिंग यांनी 1-1 विकेट घेत राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 9 बाद 144 धावांवरच रोखलं.

त्यानंतर 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचीही चांगलीच दमछाक झाली. राजस्थानच्या आवेश खान, ट्रेंट बोल्ट आणि युजवेंद्र चहल यांनी मिळून 48 धावांवरच पंजाबचे चार फलंदाज माघारी धाडले होते. त्यामुळे पंजाबसमोरील आव्हान कठीण झालं होतं. पण त्याचवेळी कर्णधार सॅम करन उभा राहिला.

त्यानं कर्णधाराला साजेसा खेळ केला आधी त्यानं जितेश शर्माला हाताशी घेतलं. जितेश 22 धावांवर बाद झाल्यानंतर त्याला आशुतोष शर्मानं साथ दिली. त्यामुळे सॅम करनने अर्धशतक तर पूर्ण केलेच आणि अखेरीस आशुतोषसह पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तबही केलं. पंजाबने 19 ओव्हरमध्येच 145 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं.

आता पंजाबचाही शेवटचा साखळी सामना बाकी आहे, त्यामुळे आता पंजाब हीच विजयी लय कायम ठेवत गोड शेवट करण्याचा प्रयत्न करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT