Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans sakal
IPL

SRH vs GT : हैदराबादला प्ले-ऑफचे तिकीट की गुजरात शेवटच्या लढतीत घालणार विजयाला गवसणी... कोण पडणार कोणावर भारी?

Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans : सनरायझर्स हैदराबादचा संघ आज गुजरात टायटन्सशी दोन हात करणार आहे. या लढतीत विजय मिळवल्यास हैदराबादचा प्ले-ऑफमधील प्रवेश पक्का होणार आहे.

Kiran Mahanavar

Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील प्ले-ऑफमधील दोन संघ निश्‍चित झाले आहेत. कोलकता नाईट रायडर्स व राजस्थान रॉयल्स या दोन संघांनी अंतिम चारमध्ये वाटचाल केली आहे. उर्वरित दोन जागांसाठी चुरस रंगणार आहे.

सनरायझर्स हैदराबादचा संघ आज गुजरात टायटन्सशी दोन हात करणार आहे. या लढतीत विजय मिळवल्यास हैदराबादचा प्ले-ऑफमधील प्रवेश पक्का होणार आहे. गुजरातचा संघ मात्र साखळी फेरीच्या अखेरच्या लढतीत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल. गुजरातने विजयाने शेवट गोड केल्यास हैदराबादला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी अखेरच्या लढतीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हैदराबादचा संघ फलंदाजी विभागात दमदार कामगिरी करीत आहे. ट्रॅव्हिस हेड (५३३ धावा), अभिषेक शर्मा (४०१ धावा), हेनरिक क्लासेन (३३९ धावा) या त्रिमूर्तींनी धावाच धावा केलेल्या आहेत. आगामी महत्त्वाच्या लढतींमध्ये या तीनही फलंदाजांकडून अशाच प्रकारच्या पुनरावृत्तीची गरज आहे. धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या फलंदाजांकडून सातत्यपूर्ण कामगिरीची आवश्‍यकता आहे.

नितीशकुमार रेड्डी (२३९ धावा व तीन विकेट) याने अष्टपैलू चमक दाखवली असून आगामी काळात त्याच्यासाठी भारतीय दरवाजेही उघडे होऊ शकणार आहेत. हैदराबादचा गोलंदाजी विभागही छान कामगिरी करीत आहे. कर्णधार पॅट कमिन्स (१४ विकेट) याने कोणत्याही टप्प्यामध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. भुवनेश्‍वर कुमारचा (११ विकेट) अनुभव यावेळी मदतीला धावून येत आहे. टी. नटराजनने हैदराबादसाठी या मोसमात सर्वाधिक १५ फलंदाज बाद केले आहेत. या सर्वांच्या खांद्यावर हैदराबादच्या गोलंदाजीची धुरा अवलंबून असणार आहे.

शमीच्या अनुपस्थितीचा फटका

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात गुजरात संघाने मागील दोन्ही मोसमांत उल्लेखनीय कामगिरी केली होती, पण यंदा तो मुंबई संघाकडून खेळला आणि गुजरात संघामध्ये पोकळी निर्माण झाली. गुजरातच्या संघामध्ये दर्जेदार अष्टपैलू खेळाडू नाहीत. तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली. अव्वल दर्जाच्या वेगवान गोलंदाजांचा अभावही गुजरातच्या संघामध्ये दिसून आला. मोहित शर्मा, नूर अहमद, राशीद खान यांच्यापैकी कुणालाही निर्णायक क्षणी ठसा उमटवता आलेला नाही.

गिल, सुदर्शनवर फलंदाजी अवलंबून

गुजरातचा संघ फलंदाजी विभागात कर्णधार शुभमन गिल व साई सुदर्शन या दोघांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. डेव्हिड मिलर, रिद्धीमान साहा, शाहरुख खान, विजय शंकर यांच्या बॅटमधून धावाच निघालेल्या नाहीत. याचा विपरित परिणाम संघाच्या कामगिरीवर झालेला आहे. पण आता आव्हान संपुष्टात आल्यानंतर हे सर्व खेळाडू दबाव न घेता मनसोक्त खेळतील अशी आशा आहे. त्यामुळे हैदराबादसमोर कडवे आव्हान असेल, असे गृहीत धरायला हरकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: राज्यात हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार ते रिटेंशनमध्ये विराट कोहली सर्वात महागडा भारतीय खेळाडू

Latest Marathi News Updates : बेळगावात आज काळा दिन फेरी, मराठी ताकद दाखवण्याचे म. ए. समितीचे आवाहन

कोरोनातील 170 कोटींचे ऑक्सिजन प्लांट धुळखात! देखभाल दुरुस्तीसाठी तज्ज्ञ पण नाहीत अन्‌ निधीही नाही; ‘पीएसए’ प्लांटच्या ठिकाणी आता बॉटलिंगचा प्रस्ताव

Panchang 1 November: आजच्या दिवशी देवीला बेसन लाडूचा नैवेद्य दाखवावा

Seat Sharing: MVA मधील जागा वाटपाचा वाद कसा मिटणार? शरद पवारांनी सांगितला प्लॅन 

SCROLL FOR NEXT