Travis Head Sakal
IPL

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Pranali Kodre

SRH vs RR, IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL) स्पर्धत शुक्रवारी (2 मे) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना झाला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादने 1 धावेने रोमांचक विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात ट्रेविस हेडला मिळालेल्या जीवदानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

झाले असे की प्रथम फलंदाजीला उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादकडून १५ व्या षटकात हेन्रिक क्लासेन आणि ट्रेविस हेड फलंदाजी करत होते. यावेळी तिसऱ्या चेंडूवर हेडने शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याची बॅट चेंडूला लागली नाही, तो क्रिजच्या पुढे होता.

यावेळी तो चेंडू लगेचचा राजस्थानचा यष्टीरक्षक संजू सॅमसनने स्टम्पवर फेकला. तो चेंडू बेल्स उडवेपर्यंत हेडची बॅट क्रिजच्या आत तर आली होती, मात्र हवेत तरंगत होती. त्यावर घेण्यात आलेल्या रिव्ह्युनंतर थर्ड अंपायरने त्याला नाबाद घोषित केले.

यावर राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट संचालक कुमार संगकारानेही याबाबत फोर्थ अंपायरकडे विचारणा केली. त्यावेळी हेडने अर्धशतक करून खेळत होता. त्याचमुळे त्याचा फॉर्म पाहाता त्याची विकेट महत्त्वाची होती.

मात्र, त्याच्याबाबतीत हा गोंधळ झाल्याने सध्या हा निर्णय चर्चेचा विषय ठरत आहे. यावर आता भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाणनेही प्रश्न उपस्थित केला असून पंचांवर टीका केली आहे. त्याने म्हटले आहे की 'थर्ड अंपायरकडून पुन्हा एकदा भयानक निर्णय. तिथे तपासण्यासाठी आणखी दोन फ्रेम होत्या. हेडची बॅट हवेत होती.'

दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की हेडला या जीवदानाचा फायदा उचलता आला नाही. तो पुढच्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्याने 44 चेंडूत 58 धावा केल्या.

तो बाद झाल्यानंतरही नितीश रेड्डी आणि हेन्रिक क्लासेन यांनी चांगली फलंदाजी करत हैदराबादला 20 षटकात 201 धावांपर्यंत पोहचवले. रेड्डीने 42 चेंडूत 76 धावांची नाबाद खेळी केली, तसेच 19 चेंडूत 42 धावांची नाबाद खेळी केली. राजस्थानकडून आवेश खानने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या आहेत.

त्यानंतर 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने 20 षटकात 7 बाद 200 धावा केल्या. त्यामुळे त्यांना विजयाच्या जवळ येऊनही पराभव स्विकारावा लागला. राजस्थानकडून रियान परागने 49 चेंडूत 77 धावांची खेळी केली, तर 40 चेंडूत 67 धावांची खेळी केली. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने 3 विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT