Virat Kohli Sakal
IPL

Virat Kohli: विराटचा भीमपराक्रम! ऑरेंज कॅप पटकावत IPL इतिहासात 'हा' कारनामा करणारा पहिलाच भारतीय

Orange Cap: विराट कोहलीने आयपीएल 2024 मध्ये ऑरेंज कॅप जिंकत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

Virat Kohli Orange Cap Winner: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. रविवारी चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात कोलकाताने 8 विकेट्सने विजय मिळवला.

अंतिम सामन्यानंतर या हंगामातील विजेत्या आणि उपविजेत्या संघांबरोबरच विविध पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंचाही गौरव करण्यात आला. दरम्यान, या अंतिम सामन्यानंतर या हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून विराट कोहलीवरही शिक्कामोर्तब झाले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या विराटने आयपीएल 2024 मध्ये 15 सामन्यांत 741 धावा केल्या. त्यामुळे त्याला ऑरेंज कॅप देण्यात आली. तसेच 10 लाखांची बक्षीस रक्कम देण्यात आली. यामुळे त्याच्या नावावर एक मोठा विक्रमही झाला.

विराटने आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्याने 2016 साली आयपीएलमध्ये 16 सामन्यांत 973 धावा करत ऑरेंज कॅप जिंकली होती. त्यामुळे तो आयपीएलमध्ये दोन वेळा ऑरेंज कॅप जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे.

तसेच दोन किंवा त्यापेक्षा अधिकवेळा ऑरेंज कॅप जिंकणारा एकूण तिसरा क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी डेव्हिड वॉर्नरने तीन वेळा आणि ख्रिस गेलने दोन वेळा असा कारनामा केला आहे.

वॉर्नरने 2015, 2017 आणि 2019 साली ऑरेंज कॅप पटकावली होती. तसेच गेलने 2011 आणि 2012 साली ऑरेंज कॅप जिंकली होती.

आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 खेळाडू

  • 741 धावा - विराट कोहली (15 सामने)

  • 583 धावा - ऋतुराज गायकवाड (14 सामने)

  • 573 धावा - रियान पराग (16 सामने)

  • 567 धावा - ट्रेविस हेड (15 सामने)

  • 531 धावा - संजू सॅमसन (16 सामने)

विराट हंगामात सर्वाधिक धाव करणारा खेळाडू

दरम्यान, आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराटचे नाव टॉप 5 मध्ये दोन वेळा आहे. 2016 साली त्याने केलेल्या 973 धावांमुळे या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावरही विराट आहे. तसेच आता 2024 च्या हंगामात केलेल्या 741 धावा या विक्रमाच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू

  • 973 धावा - विराट कोहली (2016)

  • 890 धावा - शुभमन गिल (2023)

  • 863 धावा - जॉस बटलर (2022)

  • 848 धावा - डेव्हिड वॉर्नर (2016)

  • 741 धावा - विराट कोहली (2024)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT