IPL 2025 Auction : आयपीएल 2025 चे मेगा ऑक्शन पुढच्या वर्षी होणार आहे. हे मेगा ऑक्शन असल्यानं सर्वत फ्रेंचायजींचे रूपडे पालटणार आहे. बीसीसीआयने या लिलावासाठी रिटेंशन पॉलिसी निश्चित केली होती. मात्र यावरून प्रत्येक फ्रेंचायजी एकमेकांविरूद्धच भिडत आहेत. याबाबत येणाऱ्या बीसीसीआयच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रिटेंशन नियमाबाबत प्रत्येक फ्रेंचायजीची वेगळीच मागणी आहे. काही खेळाडूंच्या रिटेंशनच्या बाजूने आहेत करत काही रिटेंशनच्या बाजूने नाहीयेत. अनेक फ्रेंचायजींनी 5 ते 7 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी मिळावी अशी विनंती केली आहे. तर काही फ्रेंचायजींनी आठ खेळाडू रिटेन करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडं एकही खेळाडू रिटेन करण्याची गरज नाही असंही म्हणणं असलेल्या काही फ्रेंचायजी देखील आहेत.
तीन वर्षापूर्वी झालेल्या आयपीएल 2022 च्या लिलावात बीसीसीआयने 4 खेळाडू रिटेन करण्याचा नियम लागू केला होता. यात जास्तीजास्त तीन भारतीय खेळाडू किंवा 2 विदेशी खेळाडू रिटेन करता येत होते.
बीसीसीआयसोबतच्या चर्चेत सध्या तरी यावर कोणताच तोडगा निघालेला नाही. आतापर्यंत फक्त बीसीसीआयने रिटेंशन पॉलिसी प्रक्रिया सुरू केली आहे इतकीच काय ती प्रगती. अजून फ्रेंचायजींच्या बैठका झालेल्या नाहीत. यावर एकमत होत नाहीये. त्यामुळे हा विषय सोडवणे अजून दूरच आहे.
आयपीएल 2025 चा लिलाव हा मेगा लिलाव असल्याने सर्व फ्रेंचायजी आपला संघ मजबूत करण्याच्या दृष्टीने तयारी करतील. दुसरीकडे काही फ्रेंचायजींनी काही खेळाडूंवर मोठी गुंतवणूक केली आहे. त्या खेळाडूंना या फ्रेंचायजी लिलावात उतरवण्यास तयार नाहीयेत. जास्तीजास्त फ्रेंचायजी जे म्हणतील तो निर्णय बीसीसीआय घेईल अशी शक्यता आहे. त्यामुळे 5 ते 7 खेळाडूंचे रिटेंशन होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.