IPL

ह्यू खाली कोसळल्यानंतर आयपीएल लिलाव प्रक्रियेत मोठा बदल

अनिरुद्ध संकपाळ

आयपीएल मेगा लिलाव 2022 सुरू (IPL Auction 2022) असताना ऑक्शनियर (Auctioneer) ह्यू एजमेडेस (Hugh Edmeades) रक्तदाब कमी झाल्याने खाली कोसळले होते. त्यामुळे लिलाव प्रक्रिया अर्ध्यावर थांबवण्यात आली होती. सर्व प्रकार अचानक झाल्याने सर्वच गोंधळले होते. ह्यू मंचावरून थेट तोंडावरच पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाल्याची शक्यता होती. मात्र मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थीर आहे. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहेत.

दरम्यान, आयोजकांना लिलाव प्रक्रियेबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आजच्या दिवसाचा लिलाव पुढे सुरू ठेवण्यात येणार असून. आता ह्यू एजमेडेसन यांच्या जागी प्रसिद्ध क्रीडा समीक्षक आणि अँकर चारू शर्मा (Charu Sharma) पुढील लिलाव प्रक्रिया पार पाडतील.

श्रीलंकेचा फिरकीपटू वानंदु हसरंगा (Wanindu Hasaranga) याच्यावर बोली लावणे सुरू होते. हसरंगा 10 कोटीपर्यंत पोहचला असतानाच बोली लावणारे Hugh Edmeades खाली कोसळले. ते खाली पडताना तोंडावरच पडल्याने त्यांना गंभीर जखम झाली असण्याची शक्यता आहे.

हसरंगासाठी पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात जोरदार रस्साखेच सुरू होती. दरम्यान, हसरंगा 10 कोटी पर्यंत पोहचला. यादरम्यान, मंचावरून ह्यू एडमेडेस खाली कोसळले. त्यामुळे लिलाव तत्काळ थांबवण्यात आला. याबाबत माहिती देताना आय़ोजकांनी सांगितले की त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT