CSK vs MI Sakal
IPL

IPL Auction : धोनीसाठी कायपण! सचिनमुळे CSK समोर हरली होती MI

सुशांत जाधव

एमएस धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं असलं तरी आजही तो चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू आहे. तुमच्यासाठी काय पण..म्हणत चेन्नईने त्याला पुन्हा रिटेनही केलं. मैदानातच नव्हे तर चेन्नई सुपर किंग्जच्या रणनितीमध्ये तो सक्रीय असतो. लिलावात कोणत्या खेळाडूला खरेदी करायचे हे देखील महेंद्रसिंग धोनीच (MS Dhoni) ठरवतो.

महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जनं (Chennai Super Kings) चार वेळा जेतेपद पटकावले आहे. 2020 चा हंगाम सोडला तर संघाने प्रत्येक हंगामात प्ले ऑफमध्ये प्रवेश करुन दाखवलाय. हा एक चेन्नई सुपर किंग्जच्या नावे असणारा खास रेकॉर्डच आहे. धोनीशिवाय चेन्नई ही कल्पनाच कोणी करु शकत नाही.

पण तुम्हाला माहित आहे की, ज्या चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इडियन्स यांच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर तगडी फाईट रंगते. त्या दोन फ्रेंचायझींमध्ये धोनीला संघात घेण्याबाबत चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली होती. आयपीएलच्या पहिल्या लिलावात (IPL 2008) मध्ये धोनी हा मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघात गेला असता. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरमुळे मुंबई इंडियन्सला एक पाउल मागे घ्यावे लागले.. त्यानंतर माही चेन्नईचा झाला तो कायमचा.

2008 च्या हंगामासाठी प्रत्येक संघाला आयकॉन निवडायचा होता. दिल्लीनं सेहवाग, पंजाबने युवराज सिंग आणि मुंबई इंडियन्सनं सचिनला आयकॉन खेळाडू म्हणून निवडले. संघातील महागड्या खेळाडूला जेवढी रक्कम मिळेल त्याच्या 10 टक्के अतिरिक्त रक्कम आयकॉन खेळाडूला मिळेल असा त्यावेळी नियम होता. मुंबई इंडियन्सनने सचिनसाठी (Sachin Tendulkar) 1.65 मिलियन मोजले होते. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज एका वेगळ्या रणनितीने लिलावाच्या रिंगणात उतरली होती.

त्यांच्याकडे कोणताच आयकॉन खेळाडू नव्हता. कोणत्याही परिस्थितीत धोनीला संघात घ्यायचे हे श्रीनिवासन यांनी पक्क ठरवलं होते. त्यानुसार लिलावात त्यांनी धोनीवर मोठी बोली लावली. मुंबईने त्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला. पण चेन्नईने धोनीवर 1.5 मिलियनची बोली लावल्यावर मुंबईला माघार घ्यावी लागली. सचिनला त्याहून अधिक पैसे देणं आणि केवळ दोन खेळाडूंसाठी पर्समधील 60 टक्के रक्कम खर्च करणे शक्य नव्हते त्यामुळे मुंबई इंडियन्सला माघार घ्यावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय देरकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT