IPL Auction 2022 New Rule : आयपीएलच्या मेगा लिलावासाठी सर्व फ्रँचायझी आता तयार झाले आहेत. आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी आपापली संघ बांधणी करण्यासाठी बंगळुरुमध्ये दोन दिवसीय मेगा लिलाव सत्र पार पडणार आहे. क्रिकेटच्या मैदानात सामना टाय झाला की आपल्याला सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळतो. या लिलावात आपल्याला बोली टाय झाल्यावर काय? हा सीन अनुभवायला मिळणार आहे. फ्रँचायझीसाठी ही गोष्ट चांगलीच बुचकुळ्यात पाडणारी असेल.
आयपीएल मेगा लिलावाच्या (IPL Auction 2022) पहिल्या दिवशी () 161 खेळाडूंवर बोली लागणार आहे. उर्वरित सर्व खेळाडूंवर (Players) दुसऱ्या दिवशी बोली लागेल. यावेळी लिलावातून राइट टू कार्ड हा पर्याय वगळण्यात आला आहे. त्याऐवजी एक नवा नियम (IPL Auction 2022 New Rule Bidding ) यावेळी अंमलात आणण्यात येणार आहे. हा नियम फ्रेंचायझींची धकधक वाढवणारा असा आहे. या नियमामुळे काही क्षणात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होऊ शकते.
जर लिलावावेळी एखाद्या खेळाडूवर समान बोली लागली तर 'सायलेंट टाय ब्रेकर' या नियमाचा वापर केला जाईल. या नियमानुसार फ्रँचायझी एखाद्या खेळाडूसाठी आपल्या पर्समधील 90 कोटींपेक्षा अधिक बोली लावू शकतो. ही प्रक्रिया तोपर्यंत सुरु राहिल जोपर्यंत तो खेळाडू फायनली विकला जाणार नाही. बोलीची जी अतिरिक्त रक्कम आहे ती बीसीसीआयकडे जमा होईल. ही बोली छुप्या पद्धतीने होईल. लिलावावेळी याचा खुलासा होणार नाही.
आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी शनिवारी आणि रविवारी या दोन दिवशी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता बंगळुरु येथील आयटीसी गार्डेनिया हॉटेलमध्ये मेगा लिलाव प्रक्रियेला सुरुवात होईल. सर्व संघांच्या पर्समध्ये 90 कोटींची रक्कम आहे. एका संघात कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 25 खेळाडूंना फ्रँचायझी आपल्या ताफ्यात घेऊ शकतातत. लिलावात 229 कॅप्ड (आंतरराष्ट्रीय क्रिकेटर), 354 अन कॅप्ड (देशांतर्गत क्रिकेटर) आणि 7 आयसीसी असोसिएट देशांचे सदस्य असलेले खेळाडूंचा सहभाग आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.