ipl auction 2022 Rajasthan Royals franchise big bidding on devdutt padikkal  Sakal
IPL

IPL Auction : विराटच्या जोडीदाराला रोहितसोबत खेळवण्याचा MI चा प्लॅन फसला

सुशांत जाधव

IPL Auction 2022 : आयपीएलच्या मेगा लिलावात युवा देवदत्त पडीक्कलनं सर्वच फ्रँचायझीच्या नजरेत भरल्याचे पाहायला मिळाले. 1.5 कोटी मूळ किंमत असलेल्या या युवा खेळाडूच्या नावाची घोषणा झाल्यावर अवघ्या 40 सेकंदात 20 लाखाच्या गड्यावर लावली जाणारी बोली ही 4 कोटीच्या घरात पोहचल्याचे पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात त्याला आपल्या ताफ्यात घेण्यावरुन चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली. अखेर या बोलीत राजस्थानने आपला बोलबाला दाखवून देत युवा आणि भरवशाच्या गड्याला आपल्या ताफ्यात घेतलं. (IPL Auction 2022 Rajasthan Royals Franchise Big Bidding On Devdutt Padikkal Beat Mumbai Indians)

अवघ्या 20 लाख या मूळ किंमतीसह लिलावात सामील झालेल्या अनकॅप्ड पडिक्कलसाठी रॉयल चॅलेंजर्संनं पुन्हा संघात घेण्याची पसंती दाखवली नाही. क्विंटन डिकॉकसाठी हात आखडता घेतलेल्या मुंबई इंडियन्सने विराटच्या जोडीदार रोहितच्या साथीनं खेळवण्यासाठी पुरेपूर पर्यत्न केला. पण अखेर राजस्थानने त्यांच्यापेक्षा अधिक बोली लावून त्याला 7.75 कोटीला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं.

आयपीएलच्या मागील दोन हंगामात पडिक्कलने आपल्यातील क्षमता दाखवून दिली आहे. 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो 11 व्या स्थानावर होता. 14 सामन्यात एका दमदार शतकाच्या जोरावर त्याने 411 धावा कुटल्या होत्या. दोन हंगामाचा विचार करता त्याने 29 सामन्यात 884 धावा केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT