mayank markande sakal
IPL

Sunrisers Hyderabad : मार्कंडे, त्रिपाठीच्या शानदार खेळाने सनरायझर्स हैदराबादचा पहिला विजय

सनरायझर्स हैदराबादने रविवारी आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पहिला विजय मिळवला.

सकाळ वृत्तसेवा

सनरायझर्स हैदराबादने रविवारी आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पहिला विजय मिळवला.

हैदराबाद - सनरायझर्स हैदराबादने रविवारी आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पहिला विजय मिळवला. मयांक मार्कंडेची प्रभावी गोलंदाजी आणि राहुल त्रिपाठी याच्या जबरदस्त अर्धशतकी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्सवर ८ विकेट राखून मात केली. पंजाब किंग्सचा हा पहिलाच पराभव ठरला.

पंजाबकडून हैदराबादसमोर १४४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. हॅरी ब्रुक (१३ धावा) व मयांक अगरवाल (२१ धावा) या सलामीवीरांनी आश्‍वासक सुरुवात केली. पण त्यांना मोठी कामगिरी करता आली नाही. राहुल त्रिपाठी याने नाबाद ७४ धावांची आणि कर्णधार एडन मार्करम याने नाबाद ३७ धावांची खेळी करीत हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्रिपाठी याने आपल्या खेळीत १० चौकार व ३ षटकार मारले. त्रिपाठी व मार्करम जोडीने नाबाद १०० धावांची भागीदारी रचली.

दरम्यान, याआधी हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भुवनेश्‍वरकुमार व मार्को यान्सेन या वेगवान गोलंदाजांनी पंजाबचे तीन फलंदाज २२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवून कर्णधाराचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सार्थ ठरवला. त्यानंतर शिखर धवन व वरच्या क्रमांकावर बढती मिळालेला सॅम करण या दोघांनी ४१ धावांची भागीदारी करीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मयांत मार्कंडे याने करण याला २२ धावांवर बाद करीत जोडी तोडली.

त्यानंतर फक्त आणि फक्त धवनचा सुपर शो पाहायला मिळाली. एकीकडे पंजाबचे फलंदाज एकामागोमाग एक असे तंबूत जात असताना त्याने एकाकी झुंज दिली. सिकंदर रझा (५ धावा), शाहरुख खान (४ धावा), हरप्रीत ब्रार (१ धाव), राहुल चहर (०), नॅथन एलिस (०), मोहीत राठी (नाबाद १ धाव) यांच्याकडून निराशा झाला. पण धवन याने ६६ चेंडूंमध्ये १२ नेत्रदीपक चौकार व ५ दमदार षटकारांसह नाबाद ९९ धावांची मौल्यवान खेळी केली. पंजाबने २० षटकांत ९ बाद १४३ धावा फटकावल्या. मयांक मार्कंडे याने १५ धावा देत चार फलंदाजांना बाद केले. उमरान मलिक व मार्को यान्सेन यांनी प्रत्येकी २ फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक -

पंजाब किंग्स २० षटकांत ९ बाद १४३ धावा (शिखर धवन नाबाद ९९, सॅम करण २२, मयांक मार्कंडे ४/१५, मार्को यान्सेन २/१६, उमरान मलिक २/३२) पराभूत वि. सनरायझर्स हैदराबाद १७.१ षटकांत २ बाद १४५ धावा (राहुल त्रिपाठी नाबाद ७४, एडन मार्करम नाबाद ३७)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

IPL 2025 Auction Live: अश्विनची १० वर्षांनंतर CSK संघात घरवापसी! तब्बल इतके कोटी मोजत घेतलं संघात

Latest Maharashtra News Updates : देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या डोक्यात येतायत आश्रमवासी होण्याचे विचार? म्हणते, "महाराष्ट्रावर प्रेम नसतं तर..."

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: ऋषभ, श्रेयस आणि व्यंकटेश अय्यर या लिलावातील महागडे खेळाडू! कॉनवेची चेन्नईत घरवापसी, तर वॉर्नर-पडिक्कल अनसोल्ड

SCROLL FOR NEXT