IPL Media Rights  sakal
IPL

IPL Media Rights : 'आयपीएल प्रसारण हक्क ५० अब्ज डॉलरची झेप...' अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी केला मोठा दावा

Kiran Mahanavar

IPL Media Rights Value : आयपीएलच्या प्रसारण हक्कांकडे पुढच्या दोन दशकांत ५० अब्ज डॉलरची झेप घेण्याची क्षमता आहे, असा विश्वास आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी व्यक्त केला. प्रेक्षकांसाठी अजून आकर्षण निर्माण झाले आणि त्यांची उत्सुकता वाढवली तर ही झेप कठीण नाही, असे ते म्हणाले.

पाच वर्षांसाठी आयपीएलच्या सध्याचे प्रसारण हक्क सुमारे ६.२ अब्ज डॉलरला विकले गेले आहेत. जगभरातील खेळांच्या प्रसारण हक्कांमध्ये आयपीएल दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक ११० अब्ज डॉलर इतकी प्रसारण हक्कांची किंमत अमेरिकेतील नॅशनल फुटबॉल लीग (एनबीए) यांच्याकडे आहे.

११ वर्षांसाठी त्यांचा एवढ्या किमतीचा करार आहे. आयपीएलची लोकप्रियता, तसेच प्रायोजक आणि त्यातून मिळणारे उत्पन्न हा आयपीएलचा प्रवास पाहिला तर २०४३ पर्यंत प्रसारण हक्कांची झेप निश्चितच ५० अब्ज डॉलपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज धुमल यांनी व्यक्त केला.

आयपीएलमध्ये आलेला हा ओघ याचा फायदा महिला प्रीमियर लीग आणि लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी उपयुक्त ठरला, असे धुमल म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT