IPL Mega Auction 2022 esakal
IPL

IPL Mega Auction 2022 बाबतची सगळी माहिती एका क्लिकवर

अनिरुद्ध संकपाळ

आयपीएलचा मेगा लिलाव (IPL Mega Auction 2022) येत्या १२ आणि १३ फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये होणार आहे. या लिलावात सगळ्याच संघाचे रूपडे पालटणार असल्याने सगळ्यांचेच लक्ष यंदाच्या मेगा लिलावावर असणार आहे. याचबरोबर आयपीएलच्या १५ व्या हंगामापासून दोन नवे आयपीएल संघ मैदानात उतरणार आहेत. अहमदाबाद आणि लखनौ सुपरजायंट हे दोन संघ सामिल होणार आहेत. त्यामुळे आता आयपीएलमध्ये आठ नाही तर १० संघांचा समावेश होईल. यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक नव्या खेळाडूंवर देखील चांगली बोली लागू शकते. त्यामुळे आयपीएल २०२२ लिलाव ((IPL Auction 2022) बाबतची माहिती घेण्यासाठी क्रिकेट रसिक आतूर असणार आहेत. अशा क्रिकेट रसिकांसाठी आम्ही आयपीएल मेगा लिलावाबाबतच्या सर्व प्रश्नांची एकाच क्लिकवर उत्तरे देण्याचा प्रयत्न करत आहोत.

  • आयपीएल २०२२चा लिलाव कधी होणार आहे?

आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव हा १२ आणि १३ फेब्रुवारीला होणार आहे.

  • आयपीएल २०२२चा लिलाव कुठं होणार आहे?

आयपीएलचा लिलाव हा बंगळुरूमध्ये होणार आहे.

  • आयपीएल २०२२ चा लिलाव कोठे पाहाल?

आयपीएल २०२२ च्या लिलावाबाबतच्या सर्व अपडेट आम्ही https://www.esakal.com/ या आमच्या वेबसाईटवर देणार आहोत.

  • आयपीएल २०२२ च्या लिलावासाठी किती खेळाडूंनी नोंदणी केली?

आयपीएलच्या या मेगा लिलावासाठी जवळबास १२१४ खेळाडूंनी नोंदणी केली होती. त्यातील ८९६ खेळाडू भारतीय होते तर ३१८ खेळाडू हे परदेशी होते.

  • लिलाव प्रक्रियेत किती खेळाडू असणार आहेत?

बीसीसीआयने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार लिलावासाठी ५९० खेळाडू शॉर्टलिस्ट केले आहेत. त्यातील ३७० हे भारतीय तर २२० हे विदेशी खेळाडू आहेत.

  • आयपीएलमध्ये कोणते दोन नवे संघ सामिल झाले आहेत?

आयपीएलच्या १५ व्या हंगामापासून लखनौ सुपरजायंट आणि अहमदाबाद हे दोन नवे संघ आयपीएलमध्ये सामिल झाले आहेत.

  • आयपीएल लिलावात सर्वाधिक बेस प्राईस किती आहे?

आयपीएलमध्ये सर्वाधिक बेस प्राईस ही २ कोटी रूपये इतकी आहे. जे खेळाडू आपली बेस प्राईस २ कोटी रूपये ठेवतील त्यांची बोली २ कोटी पासून सुरू होईल.

  • सर्वाधिक बेस प्राईस असलेले किती भारतीय खेळाडू आहेत?

यंदाच्या लिलावात १७ भारतीय खेळाडूंनी त्यांची बेस प्राईस २ कोटी रूपये ठेवली आहे.

  • किती परदेशी खेळाडूंनी आपली बेस प्राईस सर्वाधिक ठेवली आहे?

एकूण ३१ परदेशी खेळाडूंनी आपली बेस प्राईस ही २ कोटी ठेवली आहे.

  • एक कोटीच्यावर बेस प्राईस ठेवलेले किती खेळाडू आहेत?

२ कोटी बेस प्राईस ठेवलेल्या खेळाडूंबाबत आपण माहिती आपण वरच्या मुद्यामध्ये पाहिली आहे. या व्यतिरिक्त २० खेळाडूंनी त्यांची बेस प्राईस १.५ कोटी रूपये ठेवली आहे. तर ३४ खेळाडूंनी त्यांची बेस प्राईस १ कोटी रूपये ठेवली आहे. या व्यतिरिक्त अजून बेस प्राईसचे विभाग आहेत.

  • जुन्या आठ खेळाडूंनी रिटेन केलेले आणि नव्या दोन संघांनी आधीच विकत घेतलेले खेळाडू कोणते?

  1. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) : रविंद्र जाडेजा, महेंद्रसिंह धोनी, ऋतूराज गायकवाड, मोईन अली.

  2. मुंबई इंडियन्स (MI) : रोहित शर्मा, जसप्रित बुमराह, केरॉन पोलार्ड, सुर्यकुमार यादव.

  3. कोलकाता नाईट रायडर्स (KKR): सुनील नारायण, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर.

  4. सनरायझर्स हैदराबाद (SRH): केन विल्यमसनस अब्दुल समदस उमरान मलिक

  5. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) : विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज

  6. दिल्ली कॅपिटल्स (DC) : रिषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, नोर्तजे.

  7. राजस्थान रॉयल्स (RR) : संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जयस्वाल

  8. पंजाब किंग्ज (PBKS) : मयांक अग्रवाल, अर्शदीप सिंग.

  9. अहमदाबाद (Ahmedabad) : हार्दिक पांड्या, राशिद खान, शुभमन गिल.

  10. लखनौ (Lucknow) : केएल राहुल, मार्कस स्टॉयनिस, रवी बिश्नोई.

  • आयपीएल २०२२ लिलावापूर्वी खेळाडू रिटेन करण्यासाठी काय निमय होते?

एक संघ चार खेळाडूंपेक्षा जास्त खेळाडू रिटेन करू शकत नाही.

३ पेक्षा जास्त भारतीय खेळाडू आणि २ पेक्षा जास्त विदेशी रिटेन करू शकत नाही.

एक संघ जास्तीजास्त दोन अनकॅप खेळाडू रिटेन करू शकतात.

ज्या संघांनी ४ खेळाडू रिटेन केले आहेत त्यांना आपल्या लिलावासाठीच्या ९० कोटी रूपयांपैकी ४२ कोटी रूपये खर्च करता येतात. संघ चार खेळाडू घेणार असेल तर पहिल्या पसंतीच्या खेळाडूसाठी १६ कोटी, दुसऱ्या पसंतीच्या खेळाडूसाठी १२ कोटी, तिसऱ्या पसंतीसाठी ८ तर चौथ्या पसंतीसाठी ६ कोटी रूपये खर्च करू शकतात.

जे संघ तीन खेळाडू रिटेन करू इच्छितात त्यांना ३३ कोटी रूपये खर्च करावे लागतील. पहिल्या पसंतीच्या खेळाडूसाठी १५ कोटी, दुसऱ्या पसंतीच्या खेळाडूसाठी ११ कोटी, तिसऱ्या पसंतीसाठी ७ कोटी रूपये खर्च करू शकता.

काही संघ आपल्या पहिल्या पसंतीच्या खेळाडूसाठी अधिक पैसे मोजू शकतात. लखनौने केएल राहुलसाठी १७ कोटी रूपये खर्च केले आहेत. मात्र जितकी जास्त रक्कम खर्च केली जाईल तितकी रक्कम फ्रेंचायजीच्या सॅलरी कॅप ( ९० कोटी) मधून वजा होते.

  • लिलावासाठी एक संघ एकूण किती रक्कम खर्च करू शकतो?

एका संघाला ९० कोटी रूपये खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे. यातून ज्या खेळाडूंना अधीच रिटेन केले आहे किंवा विकत घेतले आहे त्यांना दिलेली रक्कम वजा होते.

  • रिटेन किंवा साईन केल्यानंतर १० संघांकडे प्रत्येकी किती रक्कम शिल्लक राहिली आहे?

चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings)

रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) १६ कोटी रूपये,महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) १२ कोटी रूपये,मोईन अली (Moeen Ali) ८ कोटी रुपये ,ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) ६ कोटी रूपये

मेगा ऑक्शनसाठी शिल्लक ४८ कोटी

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)

रोहित शर्मा (Rohit Sharma) १६ कोटी रूपये (INR 16 crore),जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) १२ कोटी रूपये (INR 12 crore),सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ८ कोटी रूपये (INR 8 crore)कायरन पोलार्ड (Kieron Pollard) ६ कोटी रूपये (INR 6 crore)

मेगा ऑक्शनसाठी शिल्लक ४८ कोटी रुपये

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore)

विराट कोहली (Virat Kohli) १५ कोटी रूपये (INR 15 crore)ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) ११ कोटी रूपये (INR 11 crore)मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) ७ कोटी रूपये (INR 7 crore)

मेगा ऑक्शनसाठी शिल्लक ५७ कोटी रूपये

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)

केन विलियमसन (Kane Williamson) १४ कोटी रूपये (INR 14 crore),अब्दुल समाद (Abdul Samad) ४ कोटी रूपये (INR 4 crore),उमरान मलिक (Umran Malik) ४ कोटी रूपये (INR 4 crore)

मेगा ऑक्शनसाठी शिल्लक ६८ कोटी

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)

संजू सॅमसन (Sanju Samson) १४ कोटी रूपये (INR 14 crore),जोस बटलर (Jos Buttler) (INR 10 crore),यशस्वी जैसवाल (Yashasvi Jaiswal) ४ कोटी रूपये (INR 4 crore)

मेगा ऑक्शनसाठी शिल्लक ६२ कोटी

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)

आंद्रे रसेल (Andre Russell) १२ कोटी रूपये (INR 12 crore), वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) ८ कोटी रूपये (INR 8 crore), व्यकटेश अय्यर (Venkatesh Iyer) ८ कोटी रूपये (INR 8 crore), सुनिल नरेन (Sunil Narine) ६ कोटी रूपये (INR 6 crore)

मेगा ऑक्शनसाठी शिल्लक ४८ कोटी रूपये

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)

ऋषभ पंत (Rishabh Pant) १६ कोटी रूपये (INR 16 crore), अक्षर पटेल (Axar Patel) ९ कोटी रूपये (INR 9 crore), पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ७.५ कोटी रूपये (INR 7.5 crore), अॅन्रीच नॉर्खिया (Anrich Nortje) ६.५ कोटी रूपये (INR 6.5 crore)

मेगा आक्शनसाठी शिल्लक ४७.५ कोटी रूपये

पंजाब किंग्ज (Punjab Kings)

मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) १२ कोटी रूपये (Rs 12 crore), अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) ४ कोटी रूपये (Rs 4 crore)

मेगा ऑक्शनसाठी शिल्लक ७२ कोटी रूपये

अहमदाबाद (Ahmedabad)

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) १५ कोटी रूपये (INR 15 crores), राशिद खान (Rashid Khan) १५ कोटी रूपये (INR 15 crores), शुभमन गिल (Shubman Gill) ८ कोटी रूपये (INR 8 crores)

मेगा ऑक्शनसाठी शिल्लक ५२ कोटी रूपये

लखनौ (Lucknow)

केएल राहुल (KL Rahul) १७ कोटी रूपये (INR 17 crore) मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) ९.२ कोटी रूपये (INR 9.2 crore) रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) ४ कोटी रूपये (INR 4 crore)

मेगा ऑक्शनसाठी शिल्लक ५८ कोटी रूपये

  • एक फ्रेंचायजी किती खेळाडू विकत घेऊ शकते?

एका संघाला आपल्या रोस्टरवर जास्तीजास्त २५ खेळाडूंना घेण्याची मुभा आहे.

  • राईट टू मॅच कार्ड २०२२ च्या लिलावात वापरण्याची संधी फ्रेंचायजींना मिळणार का?

नाही. यंदाच्या लिलावासाठी हा पर्याय दिलेला नाही. कारण नव्या दोन संघांवर अन्याय होण्याची शक्यता आहे.

  • यंदाच्या आयपीएलमध्ये किती कॅप, अनकॅप, असोसिएट खेळाडू लिलावात उतरणार आहेत?

एकूण 590 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. त्यात 228 कॅप, 355 अनकॅप आणि 7 असोसिएट खेळाडूंचा समावेश आहे.

  • आयपीएल 2022 च्या लिलावात कोणकोणत्या देशातील खेळाडू उतरणार आहेत?

अफगाणिस्तान - 17, ऑस्ट्रेलिया -47, बांगलादेश- 5, इंग्लंड- 24, आयर्लंड- 5, न्यूझीलंड- 24, दक्षिण आफ्रिका- 33, श्रीलंका- 23, वेस्ट इंडीज 34, झिम्बाब्वे 1, नामिबिया- 3, नेपाळ- 1, स्कॉटलंड- 2, अमेरिका- 1

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT