You Know charu sharma arrived in auction venue on just one  Sakal
IPL

IPL Auction : मोजके कपडे घ्या अन् पटकन वेन्यूवर या!

सुशांत जाधव

IPL Mega Auction 2022, Charu Sharma Story : आयपीएलच्या मेगा लिलावात थाटात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी जवळपास अडीच तास झाल्यानंतर ऑक्शनर ह्यूज एडमीड्स (Hugh Edmeades) यांची प्रकृती खालावली. ते अचानक जमीनीवर कोसळले. या धक्कादायक घटनेनंतर लिलाव प्रक्रिया थांबवण्यात आली. काही वेळानंतर प्राथमिक उपचारानंतर Hugh Edmeades यांची प्रकृती स्थिर झाली. पण गवर्निंग काउंसिलनं त्यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला.

या लिलावासाठी अचानकपणे नवा चेहरा सर्वांच्या समोर आला. चारु शर्मा (Charu Sharma ) यांना पर्यायी ऑक्शनर म्हणून बोलावण्यात आले. ज्यावेळी आयपीएलच्या मोठ्या व्यासपीठावर एवढी मोठी घटना घडली त्याची कल्पनाही चारु शर्मा यांना नव्हती. मी टीव्हीही ऑन केला नव्हता. त्यामुळे या घटनेची कोणतीही कल्पना नव्हती. अचानक इंडियन प्रीमियर लीग (IPL) गवर्निंग काउंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांचा फोन आला. इथं इमर्जन्सी आहे. तयार होऊन मोजक्या कपड्यांसह लगेच वेन्यूवर पोहचा, अशा शब्दांत त्यांनी मला बोलावलं, होतं अशी माहिती चारू शर्मा यांनी एका मुलाखतीमध्ये दिली.

कॉल आला त्यावेळी नेमका काय प्रकार आहे याची त्यांना कल्पनाच नव्हती. ते ITC Gardenia हॉटेल जवळच वास्तव्यास होते. त्यामुळे ट्रॅफिकशिवाय ते 15 ते 20 मिनिटात हॉटेलमध्ये पोहचले. ज्यावेळी ब्रिजेश पटेल यांनी त्यांना कॉल केला त्यावेळी त्यांच्या घरी पाहुणेही आले होते. 15 मिनिटांत काय झाले आणि काय करायचे याचा आढावा घेऊन हा अवलिया ऑक्शनर म्हणून उभा राहिला. नव्वदीच्या दशकातील क्रिकेट चाहत्यांसाठी चारु शर्मा हे नाव नवे नाही. पण ऑक्शन ते कशापद्धतीने पुढे नेतील याची शंका होती. अनुभवी चारु शर्मांनी आपल्या प्रेंजटेशननं फ्रँचायझींकडून दादही मिळवली.

कोण आहेत चारु शर्मा?

चारु शर्मा हे प्रसिद्ध समालोचक आहेत. एवढेच नाही तर सध्याच्या घडीला भारतात लोकप्रिय असलेल्या प्रो कबड्डी लीगचे ते डायरेक्टरही आहेत. 2008 च्या पहिल्या आयपीएल हंगामात ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे CEO होते. संघाच्या खराब कामगिरीनंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

चारु शर्मा हे टेलिव्हिजन प्रेजेंटेर असून क्रिकेट हा त्यांचा प्रमुख विषय राहिला आहे. 2003 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांनी मंदिरा बेदीसोबत पोस्ट मॅच प्रेजेंटेशन कार्यक्रमात दिसले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT