IPL 2022 : सलग पाच पराभवांमुळे स्वतःच्याच वाटेत अडथळे निर्माण करणाऱ्या हैदराबादच्या अंधुक आशा जिवंत ठेवण्यासाठी आज मुंबई इंडियन्सचे आव्हान मोडून काढावे लागणार आहे. मुंबई संघाकडे आता तळाचे स्थान मागे टाकायचे हे एकमेव ध्येय आहे.
वानखेडे स्टेडियमवर आज होणाऱ्या या सामन्याचा पहिल्या चार संघांच्या क्रमवारीत बदल करणार नाही. सलग पाच विजय आणि त्यानंतर सलग पाच पराभव असा स्वतःचा आलेख खाली आणणाऱ्या हैदराबादला उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे १४ गुण होऊ शकतील. मुळात या चौथ्या स्थानासाठी बंगळूरसह चार संघांची स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे हैदरबादसाठी जिंकूनही काही फरक पडणार नाही.
हैदराबाद संघात वॉशिंग्टन सुंदर आणि टी. नटराजन हे दुखापत झालेले खेळाडू कोलकताविरुद्धच्या सामन्यात परतले होते. वेगवान गोलंदाज उमरान मलिकलाही पुन्हा लय सापडली, तरीही त्यांचा पराभव झाला होता.
विल्यम्सनची चूक
कोलकताविरुद्धच्या सामन्यात गोलंदाज वापरात केन विल्यमसन त्याच्याकडून चूक झाली. वॉशिंग्टन सुंदरला अखेरचे षटक देण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता आणि या षटकात आंद्रे रसेलने तीन षटकार मारून कोलकताची धावसंख्या भक्कम केली होती. मुळात विल्यम्सनचा फॉर्मही संघासाठी चिंतेचा ठरत आहे.
मुंबई शेवटचे स्थान टाळणार ?
गमावण्यासारखे काहीच नसलेल्या मुंबईने गेल्या सामन्यात चेन्नईचा पराभव केला होता, तरीही ते चेन्नईला गुणतक्त्यात मागे टाकू शकले नव्हते. अखेरचा क्रमांक टाळण्यासाठी मुंबई आणि चेन्नई यांच्यात चुरस आहे. स्पर्धा संपत असताना मुंबईचे गोलंदाज फॉर्मात येत आहेत. गेल्या सामन्यात त्यांनी चेन्नईचा डाव ९७ धावांत गुंडाळला होता. आता हैदराबादची फलंदाजी पाहता मुंबईचे गोलंदाज वर्चस्व राखतील, अशी अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.