ipl mumbai indians kieron pollard support hardik pandya cricket Sakal
IPL

पोलार्ड यांच्याकडून हार्दिकची पाठराखण

संघाच्या पराभवास एका खेळाडूस टार्गेट करणे योग्य नाही. तसेच सततच्या विरोधाचा हार्दिकच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे पराभवास त्याला सर्वस्वी जबाबदार धरू नये, असे सांगत मुंबई संघाचे फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्ड यांनी हार्दिकची पाठराखण केली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : संघाच्या पराभवास एका खेळाडूस टार्गेट करणे योग्य नाही. तसेच सततच्या विरोधाचा हार्दिकच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे पराभवास त्याला सर्वस्वी जबाबदार धरू नये, असे सांगत मुंबई संघाचे फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्ड यांनी हार्दिकची पाठराखण केली.

क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूचे कमी-जास्त प्रमाणात योगदान होत असते. त्यामुळे पराभवास केवळ एकाच खेळाडूला जबाबदार धरून त्याला टार्गेट करणे योग्य नाही, असे पोलार्ड यांनी मुंबई संघाचा चेन्नईविरुद्ध पराभव झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

हार्दिक हा आत्मविश्वास उंचावलेला खेळाडू आहे. तो आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये जसे चांगले दिवस असतात तसे वाईट दिवसांचाही सामना करावा लागतो. मुंबई इंडियन्स संघातील त्याचा प्रवास मी जवळून पाहिलेला आहे, असे पोलार्ड म्हणाले.

आयपीएलमध्ये त्याच्याकडून होत असलेल्या कामगिरीचा जास्त विचार करू नये, तो येत्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करू शकेल. ही स्पर्धा अजून सहा आठवडे दूर आहे, तो पर्यंत हार्दिक निश्चितच प्रभाव पाडेल, असा विश्वास पोलार्ड यांनी व्यक्त केला.

हार्दिकने अखेरच्या षटकांत दिलेल्या २६ धावांचा फटका आम्हाला बसला हे मान्य करताना पोलार्ड म्हणतात, समोर महेंद्रसिंग धोनीसारखा फलंदाज असताना कोणाकडूनही २० धावा दिल्या जाऊ शकतात. धोनी हा विश्वविख्यात फलंदाज आहे हे विसरता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT