mumbai indians  sakal
IPL

IPL : मुंबई अंतिम सामन्यापासून एक विजय दूर

लखनौचा उडवला धुव्वा आता शुक्रवारी गुजरातशी सामना

सकाळ वृत्तसेवा

चेन्नई - गेल्या मंगळवारी झालेल्या सामन्यातील पराभवाची सव्याज परतफेड मुंबई इंडियन्सने केले. लखनौचा ८१ धावांनी दणदणीत पराभव करून आयपीएलच्या क्वॉलिफायर-२ सामन्यात धडक मारली. आकाश मधवालने अवघ्या ५ धावांत ५ विकेट अशी सनसनाटी कामगिरी केली.

अगोदर फलंदाजी त्यानंतर गोलंदाजी आणि क्षेत्ररणातही चपळता दाखवणाऱ्या मुंबईचा सामना शुक्रवारी गुजरातविरुद्ध होणार आहे.आक्रमक धावा करणे सोपे नसलेल्या खेळपट्टीवर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १८२ अशी भक्कम धावसंख्या उभारली त्यानंतर लखनौला १६.३ षटकांत १०१ धावांत गुंडाळले.

गेल्या काही सामन्यात मुंबईसाठी सर्वात महागडा ठरत असलेल्या जॉर्डनने आज कमाल केली त्याने लखनौचा सलामीवीर मायर्सला बाद केले त्याअगोदर मधवालने प्रेरक मंडकला माघारी धाडले होते. याच मधवालने लागोपाठ दोन चेंडूंवर आयुष बदोनी आणि धोकादायक निकोलर पुरन यांच्या विकेट काढून मुंबईच्या विजयाचा मार्ग खुला केला. ही सर्व घडामोड एका बाजूने घडत असताना लखनौचे मार्कस स्टॉयनिस, कृष्णाप्रा गौतम आणि दीपक हुडा हे तीन फलंदाज धावचीत झाले. तेथेच त्यांचा पराभव निश्चित झाला.

रोहित आणि इशान हे मुंबईचे सलामीवीर आक्रमक शैलीचे असल्यामुळे लखनौ कर्णधार कृणाल पंड्याने स्वतःसह फिरकी आक्रमक सुरू केले, परंतु पहिल्या षटकांत सावध पवित्रा घेतल्यानंतर या दोघांनी हल्ला चढवत ३० धावांची सलामी दिली. मात्र यश ठाकूर आणि नवीन उल हक या वेगवान गोलंदाजांनी रोहित आणि इशान यांना पाठोपाठ बाद केले.

गेल्या सामन्यातील शतकवीर कॅमेरून ग्रीन आज त्याच मूडमध्ये हल्लाबोल करत होता. दुसऱ्या बाजुला सूर्यकुमारही तळपण्याच्या मार्गावर होता पण नवीन उल हकने एकाच षटकात या दोघांनी स्लो चेंडूवर (गती कमी केलेला) बाद केले. मुंबईच्या वेगवान वाटचालीला मोठा ब्रेक लागला.

तिलक वर्माने दोन खणखणीत षटकार मारून दडपण बाजूला केले त्याचवेळी टीम डेव्हिडही फॉर्मात येत होता, पण कंबरेच्या वर नोबॉल ठरू शकलेल्या चेंडूवर तो बाद झाला. मुंबईची धावसंख्या मर्यादित रहाण्याची चिन्हे दिसत असताना वधेराने अखेरच्या षटकात १४ धावा फटकावल्या. त्याने एकूण १२ चेंडूत २३ धावांची खेळी केली त्यामुळे मुंबईला १८२ धावांपर्यंत मजल मारता आली.

संक्षिप्त धावफलक

मुंबई ः २० षटकांत ८ बाद १८२ (कॅमेरून ग्रीन ४१ - २३ चेंडू, ६ चौकार, १ षटकार, सूर्यकुमार यादव ३३ - २० चेंडू, २ चौकार, २ षटकार, तिलक वर्मा २६ -२२ चेंडू, २ षटकार, नेहल वधेरा २३ -१२ चेंडू, २ चौकार, २ षटकार, नवीन उल हक ४-०-३८-४, यश ठाकूर ४-०-३४-४) वि. वि. लखनौ ः १६.३ षटकांत सर्वबाद १०१ (केली मायर्स १८ -१३ चेंडू ३ चौकार, मार्कस स्टॉयनिस ४० -२७ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, दीपक हुडा १५ - १३ चेंडू, १ षटकार, आकाश मधवाल ३.३-०-५-५, ख्रिस जॉर्डन २-१-७-१, पियुष चावला ४-०-२८-१)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT