सूर्यकुमार यादव sakal
IPL

IPL : मुंबईचा पुन्हा यशस्वी द्विशतकी पाठलाग

पंजाबच्या पराभवाची परतफेड; इशान, सूर्यकुमारची झंझावाती फलंदाजी

सकाळ वृत्तसेवा

मोहाली : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या वानखेडे स्टेडियमवरील लढतीत २१३ धावांचा यशस्वी पाठलाग केल्यानंतर मुंबई इंडियन्सने बुधवारी मोहालीत यजमान पंजाब किंग्सविरुद्ध २१५ धावांचे आव्हान लीलया ओलांडले. मुंबई इंडियन्सचा यंदाच्या मोसमातील हा पाचवा विजय ठरला. पंजाब किंग्सला पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले.

इशान किशन (७५ धावा) व सूर्यकुमार यादव (६६ धावा) यांची झंझावाती फलंदाजी मुंबई इंडियन्सच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरली. दोघांनी ११६ धावांची भागीदारी करताना पंजाब किंग्सच्या गोलंदाजांची भंबेरी उडवली. मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या पराभवाची परतफेड याप्रसंगी केली.

पंजाबकडून मिळालेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. ऋषी धवनच्या गोलंदाजीवर कर्णधार रोहीत शर्मा शून्यावर बाद झाला. त्यानंतर इशान व कॅमेरून ग्रीन (२३ धावा) ही जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच नॅथन इलिसने ग्रीनला बाद केले. सूर्यकुमार व इशान या जोडीने मुंबईचा डाव सावरला.

दोघांनी विजयाची आस कायम ठेवली. पण इलिसने सूर्यकुमारला ६६ धावांवर आणि अर्शदीप सिंगने इशानला ७५ धावांवर बाद करीत सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र टीम डेव्हिड (नाबाद १९ धावा) व तिलक वर्मा (नाबाद २६ धावा) या जोडीने मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, याआधी मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अर्शद सिंगच्या गोलंदाजीवर प्रभसिमरन सिंग ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार शिखर धवन व मॅथ्यू शॉर्ट या जोडीने ४९ धावांची भागीदारी रचली. पियुष चावलाने धवनला ३० धावांवर आणि त्यानंतर शॉर्टला २७ धावांवर बाद करीत मुंबईसाठी मोलाची कामगिरी केली.

लियाम लिव्हींगस्टोन व जितेश शर्मा या जोडीने ११९ धावांची भागीदारी करताना मुंबईच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. दोघांनीही या भागीदारीत नेत्रदीपक फटके मारले. लियाम याने नाबाद ८२ धावांची, तर जितेश याने नाबाद ४९ धावांची खेळी साकारली. लियाम याने आपली खेळी ७ चौकार व ४ षटकारांनी सजवली. जितेश याने आपल्या खेळीत ५ चौकार व २ षटकार मारले. पंजाबने २० षटकांत ३ बाद २१४ धावा फटकावल्या. मुंबईकडून पियूषने २९ धावा देत २ फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक

पंजाब किंग्स २० षटकांत ३ बाद २१४ धावा (शिखर धवन ३०, मॅथ्यू शॉर्ट २७, लियाम लिव्हींगस्टोन नाबाद ८२, जितेश शर्मा नाबाद ४९, पियुष चावला २/२९) पराभूत वि. मुंबई इंडियन्स १८.५ षटकांत ४ बाद २१६ धावा (इशान किशन ७५, कॅमेरून ग्रीन २३, सूर्यकुमार यादव ६६, टीम डेव्हिड नाबाद १९, तिलक वर्मा नाबाद २६).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT