Shikhar Dhawan  esakal
IPL

IPL news 2023 : पंजाबला चिंता धवनच्या दुखापतीची

बंगळूर विजयी मार्गावर येण्यास प्रयत्नशील

सकाळ वृत्तसेवा

मोहाली : आतापर्यंत आयपीएलच्या जेतेपदापासून सातत्याने दूर राहिलेल्या पंजाब किंग्सच्या संघाने यंदाच्या मोसमात समाधानकारक सुरुवात केली आहे. पहिल्या पाच लढतींमधून तीनमध्ये विजय मिळवणाऱ्या पंजाब किंग्ससमोर उद्या घरच्या मैदानावर होणाऱ्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे आव्हान असणार आहे. पंजाब किंग्ससमोर या लढतीआधी मोठा यक्षप्रश्‍न उभा ठाकला आहे. कर्णधार शिखर धवन दुखापतीमधून पूर्णपणे बरा झाला की नाही, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. त्याच्या दुखापतीकडे या वेळी लक्ष असणार आहे.

पंजाबने १५ एप्रिल रोजी झालेल्या लढतीत लखनौवर २ विकेट राखून रोमहर्षक विजय मिळवला. या लढतीत धवनऐवजी सॅम करन याच्याकडे पंजाब संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. पंजाबच्या विजयात मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग, शाहरूख खान, सिकंदर रझा या चार खेळाडूंनी निर्णायक क्षणी छान फलंदाजी करीत ठसा उमटवला. बंगळूरविरुद्धच्या लढतीत पंजाबला आपला खेळ आणखी उंचावावा लागणार आहे. धवनने आतापर्यंत या स्पर्धेत २३३ धावा फटकावल्या आहेत. त्यामुळे पंजाबसाठी त्याची उपस्थिती महत्त्वाची ठरणार आहे.

पंजाबचा गोलंदाजी विभाग हा फलंदाजी विभागापेक्षा सरस आहे. सॅम करन, अर्शदीप सिंग व कागिसो रबाडा हे तीन वेगवान गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यात यशस्वी होत आहेत. मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत ब्रार, राहुल चहर व सिकंदर रझा या गोलंदाजांनी तीन वेगवान गोलंदाजांना साथ दिल्यास बंगळूरच्या फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात त्यांना यश मिळेल.

दिल्लीसाठी करो वा मरो लढत

दिल्ली कॅपिटल्स ः कोलकता नाईट रायडर्स यांच्यामध्येही उद्या आयपीएलमधील लढत रंगणार आहे. ही लढत दिल्लीसाठी करो वा मरो अशीच असणार आहे. दिल्लीला आतापर्यंत झालेल्या पाचही लढतींमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आणखी एक पराभव त्यांना प्ले ऑफपासून दूर नेऊ शकतो.

सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव

बंगळूरच्या संघात विराट कोहली, फाफ ड्युप्लेसी, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक हे स्टार फलंदाज आहेत, पण पाच सामन्यांमधून त्यांना फक्त दोनच लढतींमध्ये विजय मिळवता आला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वरच्या क्रमांकावरील फलंदाजांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून येत आहे.

गोलंदाजी विभागात हर्षल पटेलला अखेरच्या षटकांमध्ये प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. मोहम्मद सिराज व वेन पार्नेल संघासाठी सर्वस्व पणाला लावत आहेत. फिरकी गोलंदाज वनिंदू हसरंगा याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

आजच्या लढती

  • पंजाब किंग्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळूर

  • स्थळ - मोहाली

  • वेळ - दुपारी ३.३० वाजता

  • प्रक्षेपण - स्टार स्पोर्टस्

  • दिल्ली कॅपिटल्स - कोलकता नाईट रायडर्स

  • स्थळ - दिल्ली

  • वेळ - संध्याकाळी ७.३० वाजता

  • प्रक्षेपण - स्टार स्पोर्टस्

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT