IPL 2023 Points Table : आयपीएल 2023 मध्ये, शनिवार 29 एप्रिल हा दिवस खास ठरला. रिव्हर्स फिक्स्चर सुरू केल्यानंतर प्रथमच, संघांनी या हंगामात त्यांच्या मागील पराभवाचा बदला घेतला, तोही त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या घरात घुसून. एकीकडे गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला , तर सनरायझर्स हैदराबादनेही दिल्ली कॅपिटल्ससह बरोबरी साधली. याचा फायदा दोघांनाही झाला आहे. विशेषत: चॅम्पियन गुजरात संघाला, जो आता पाँइट टेबलवरती नंबर वन बनला आहे.
शनिवारी दुहेरी हेडर कोलकातामध्ये गुजरातने केकेआरचा 7 विकेट्सने पराभव केला. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 179 धावा केल्या होत्या, हे लक्ष गुजरातने 18 व्या षटकातच गाठले. त्यानंतर नवी दिल्लीतील दुसऱ्या सामन्यात हैदराबादने दमदार फलंदाजी आणि चुरशीच्या गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सचा 9 धावांनी पराभव केला. हैदराबादच्या 197 धावांच्या प्रत्युत्तरात दिल्लीला केवळ 188 धावा करता आल्या.
चॅम्पियन गुजरात अव्वल
हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सने आतापर्यंत इतर तीन संघांसह 10-10 गुणांवर अडकलेल्या गुजरातने 8 सामन्यांत सहाव्या विजयासह पहिले स्थान मिळविले आहे. आता संघाचे 12 गुण झाले असून ती राजस्थानच्या पुढे गेला आहे. त्याचवेळी कोलकाताने पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मागे टाकण्याची संधी गमावली.
त्याचवेळी, दिल्लीच्या गुणांशी बरोबरी करण्याबरोबरच हैदराबादनेही गुणतालिकेत झेप घेतली. त्यांचा हा तिसरा विजय असून त्यांनी कोलकाता आणि मुंबई इंडियन्सची बरोबरी केली. तिघांचेही 6-6 गुण आहेत. निव्वळ धावगतीमुळे केकेआर त्याच्या पुढे आहे. पण हैदराबादने येथे मुंबईला मागे टाकले आणि नवव्या स्थानावरून आठव्या स्थानावर झेप घेतली.
CSK की RR विजेता कोण असेल?
रविवार म्हणजे आजही स्पर्धेत दुहेरी हेडर आहे आणि पुन्हा गुणतालिकेच्या शीर्षस्थानी आणि मध्यभागी मोठे बदल होऊ शकतात . दिवसाच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज आमनेसामने आहेत. चेन्नई येथे मोठ्या विजयासह पहिले स्थान मिळवू शकते. दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. आयपीएलच्या इतिहासातील हा 1000 वा सामना असून हा सामना जिंकून राजस्थान पुन्हा नंबर वन बनू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.