MS Dhoni Hardik Pandya IPL 2023 Qualifier 1 esakal
IPL

MS Dhoni Hardik Pandya : महेंद्रसिंह धोनीचा द्वेष हा फक्त.... पहिल्या क्वालिफायरपूर्वी धोनीबद्दल पांड्या हे काय म्हणाला?

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni Hardik Pandya IPL 2023 Qualifier 1 : चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल क्वालिफायर 1 सामन्यापूर्वी गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीबाबत एक मोठे वक्तव्य केले. शक्यतो आपला शेवटचा आयपीएल हंगाम खेळणाऱ्या महेंद्रसिंह धोनीचा द्वेश करण्यासाठी कोणालाही राक्षस व्हावं लागले. चेन्नई आणि गुजरात चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर आज एकमेकांना भिडणार आहेत.

हार्दिक पांड्याने भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार हा खूप गंभीर व्यक्ती आहे हा भ्रम देखील दूर केला. गुजरात टायटन्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत पांड्या म्हणतो की, 'मी कायम धोनीचा प्रशंसक राहिलो आहे. एवढ्या सगळ्या क्रिकेट प्रेमींमध्ये आणि फॅन्समध्ये तुम्हाला धोनीचा द्वेष करण्यासाठी राक्षस व्हावे लागले.'

धोनीने गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात संघात जे बदल केले त्यामुळे सीएसके पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली. गेल्या हंगामात सीएसके 10 संघांमध्ये नवव्या स्थानावर होती. त्यांना प्ले ऑफ गाठता आले नव्हते. मात्र यावेळी त्यांनी प्ले ऑफ गाठली असून पाचव्यांदा आयपीएल जिंकण्यासाठी ते आपला संपूर्ण जोर लावतील.

पांड्या म्हणाला की, तो धोनीकडून अनेक गोष्टी शिकलाय. 'अनेक लोकांना धोनी हा गंभीर व्यक्ती आहे असे वाटते. मी त्याला जोक ऐकवतो त्यावेळी मी त्याला महेंद्रसिंह धोनीच्या रूपात पाहत नाही. मी त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकलो आहे. अनेक सकारात्मक गोष्टी ज्या मी त्याच्याकडे पाहून शिकलो आहे. जास्त बोलायंच नाही हे देखील त्याच्याकडूनच शिकलो आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT