IPL 2022 : चेन्नई संघात पुन्हा एकदा नेतृत्वात बदल झाला आहे. फलंदाजीवर दडपण येत असल्याचे कारण देत रवींद्र जडेजाने कर्णधारपद सोडले असून धोनीही ही जबाबदारी पुन्ही स्वीकारली. उर्वरित सामन्यात धोनी कर्णधार असणार आहे. त्यातच अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांचा आज हैदराबादविरुद्ध सामना होणार आहे.
आयपीएलला सुरुवात झाल्यानंतर सात संघांनी लगेचच खाते उघडून प्रगती सुरू केली, परंतु मुंबई, चेन्नई आणि हैदराबादला पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळवला आला नव्हता. त्यानंतर हैदराबादने चेन्नईलाच हरवून पहिला विजय मिळवला होता. आता त्याच चैन्नईविरुद्ध त्यांचा दुसरा साखळी सामना होत आहे.
हैदराबादने मात्र सलग पाच विजय मिळवून लय मिळवली आहे; मात्र चेन्नईचा संघ आठपैकी दोनच सामने जिंकू शकलेला आहे. हैदराबादला गाडी रुळावर आणण्यासाठी गोलंदाजांचा आत्मविश्वास भक्कम करावा लागणार आहे. बंगळूरविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच षटकात तीन विकेट मिळवणारा मार्को जेन्सन हिरोचा झिरो ठरला होता. गुजरात संघाच्या रशीद खानने त्यानंतर अंतिम षटकात तीन षटकार मारून जेन्सनचा आत्मविश्वास खच्ची केला होता.
विल्यम्सन अपयशी
हैदराबाद संघ एकीकडे प्रगती करत असताना त्यांचा कर्णधार केन विल्यम्सन मात्र अपयशी ठरत आहे. संघातील इतर खेळाडू अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, मार्करम हे फलंदाज योगदान देत असल्यामुळे विल्यम्सनवरचा भार हलका होत आहे. गुजरातविरुद्ध शशांक सिंगने सहा चेंडूत नाबाद २५ धावा करून सर्वांचे लक्ष वेधले होते. असे असले तरी आता विलम्यम्सनला धावा कराव्याच लागणार आहेत.
चेन्नईत सातत्याचा अभाव
चेन्नई संघात अनुभवी खेळाडू असले तरी सातत्याचा अभाव दिसून येत आहे. आदल्या सामन्यात भरीव कामगिरी करणारा खेळाडू पुढच्या सामन्यात अपयशी ठरत आहे. ऋतुराज गायकवाड, रॉबीन उथप्पा, अंबाती रायडू यांना आता सातत्य दाखवावे लागणार आहे.
उमरान विरुद्ध धोनी
या आयपीएलमध्ये सर्वाधिक चर्चा असलेल्या अतिजलद उमरान मलिकच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उद्याच्या सामन्यात अनुभवी महेंद्रसिंग धोनीविरुद्ध तो कशी कामगिरी करतो, याची उत्सुकता असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.