Delhi Capitals News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत दुसरा सामना पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला.
शनिवारी मुल्लनपूरमधील नव्या क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबने 4 विकेट्सने विजय मिळवला. मात्र, या सामन्यात दिल्लीला पराभवाबरोबरच आणखी एक मोठा धक्का बसला. दिल्लीचा प्रमुख वेगवान गोलंदाज इशांत शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे.
या सामन्यात इशांत शर्मा या सामन्यात चांगली गोलंदाजी करत होता. दिल्लीने दिलेल्या 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला पहिला धक्का इशांतनेच दिला होता. त्याने शिखर धवनला 22 धावांवर त्रिफळाचीत केले होते.
मात्र ६ व्या षटकात पंजाबच्या प्रभसिमरन सिंगने मिचेल मार्शच्या गोलंदाजीवर मारलेला शॉट आडवल्यानंतर तो पुन्हा यष्टीरक्षकाकडे फेकताना इशांतचा उजवा पाय मुरगळला. त्यामुळे त्याला प्रचंड वेदना झालेल्या दिसल्या. त्यामुळे दिल्लीचे फिजिओ लगेचच मैदानात आले आणि त्यांनी इशांतवर उपचार केले.
मात्र, त्याला त्रास होत असल्याने ते त्याला आधार देत मैदानातून बाहेर नेले. त्यामुळे इशांत पुन्हा मैदानात आला नाही. त्याच्याऐवजी प्रविण दुबे बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात आला.
दरम्यान, इशांत केवळ २ षटके टाकून मैदानातून बाहेर गेल्याने कर्णधार ऋषभ पंतला मार्शच्या सर्व ४ षटके पूर्ण करायला लागल्या. त्याच्याकडे गोलंदाजीसाठी अतिरिक्त पर्याय उरला नव्हता.
आता इशांतची ही दुखापत कितपत गंभीर आहे, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. परंतु, जर त्याची दुखापत गंभीर असेल, तर मात्र दिल्लीसाठी हा मोठा धक्का असेल.
दरम्यान, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने २० षटकात ९ बाद १७४ धावा केल्या होत्या. त्यानंतर पंजाबने १९.२ षटकात ६ बाद १७७ धावा करत सामना जिंकला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.