Delhi Capitals vs Mumbai Indians : मुंबईने दिल्ली कॅपिटल्सची अवस्था 5 बाद 98 अशी केली होती. मात्र अक्षर पटेलने 25 चेंडूत 54 धावा चोपून दिल्लीला रूळावर आणले. दिल्ली आता मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असतानाच मुंबईच्या बेहरनडॉर्फने 19 व्या षटकात दिल्लीची अवस्था बिकट केली. अखेर दिल्लीचा डाव 172 धावात संपुष्टात आला. बेहरनडॉर्फने आपल्या तिसऱ्या आणि संघाच्या 19 व्या षटकात 1 धाव देत 3 विकेट्स घेतल्या. पियुषनेही 3 विकेट घेत दिल्लीची मधली फळी उडवली. दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 47 चेंडूत 51 धावांची संथ खेळी केली.
दिल्लीविरूद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या मुंबईने दिल्लीला सुरूवातीपासूनच धक्के दिले. मात्र दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने दिल्लीची धावगती चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला. दिल्लीने पहिल्या 6 षटकात अर्धशतकी मजल मारली.
मात्र त्यानंतर पियुष चावला, ऋतिक शौकीन आणि मेरिडेथ यांच्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीची अवस्था 5 बाद 98 धावा अशी झाली. एका बाजूने दिल्लीचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत असताना कर्णधार डेव्हिड वॉर्नर एका बाजून किल्ला लढवत होता. अखेर त्याला अष्टपैली अक्षर पटेलची साथ लाभली.
अक्षर पटेलने आक्रमक फटकेबाजी करत दिल्लीला 150 च्या पार पोहचवले. दरम्यान, अक्षरने 22 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. डेव्हिड वॉर्नरनेही आपले अर्धशतक पूर्ण केले होते. मात्र शेवटची दोन षटके राहिले असताना बेहेरनडॉर्फने 54 धावांवर अक्षर पटेलला बाद केले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर देखील 47 चेंडूत 51 धावा करून बाद झाला.
याच 19 व्या षटकात कुलदीप यादवही धावबाद झाला. पाठोपाठ शेवटच्या चेंडूवर पोरेल देखील झेलबाद झाला. त्यामुळे दिल्लीची अवस्था 5 बाद 165 वरून 9 बाद 166 धावा अशी झाली. बेहरनडॉर्फने आपल्या तिसऱ्या षटकात 3 विकेट्स घेतल्या. अखेर दिल्लीचा डाव 172 धावात संपुष्टात आला.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.