Jasprit Bumrah IPL 2024 : भारताचा अव्वल दर्जाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह जर भारताकडून खेळलाच नसता तर काय झालं असतं? जर जसप्रीत बुमराह भारताकडून क्रिकेट खेळला नसता तर त्यानं कॅनडाचं प्रतिनिधित्व केलं असतं. याचाच अर्थ तो यंदाचा टी 20 वर्ल्डकप हा कॅनडाकडून खेळला असता याची शक्यता जास्त होती.
मुंबई इंडियन्सकडून यंदाचा आयपीएल हंगाम गाजवत असलेल्या जसतप्रीत बुमराहने सांगितले की जर त्याचं भारतीय क्रिकेटमध्ये काही झालं नसतं तर त्यानं बॅक अप प्लॅन म्हणून कॅनडात स्थायिक होण्याचा मार्ग निवडला असता.
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनने जिओ सिनेवरील एका कार्यक्रमात बोलताना जसप्रीत बुमराहला विचारलं की, कॅनडाला जाऊन तेथे स्थायिक होत नवं आयुष्य सुरू करण्याचा तुझा इरादा होता का?
जसप्रीत बुमराहने सांगितले की हो अशा प्रकारची चर्चा मी माझ्या कुटुंबियांशी केली होती. माझे काही नातेवाईक कॅनडात राहतात. मात्र जसप्रीत बुमारहची आई भारत सोडण्यास तयार नव्हती. त्यानंतर जसप्रीत बुमराहचे आयपीएल खेळण्याचे स्वप्न सत्यात उतरलं.
बुमराह म्हणाला की, 'आम्ही यापूर्वी चर्चा केली होती. प्रत्येक मुलाची इच्छा असते की त्यानं क्रिकेट खेळावं अन् मोठं नाव कमवावं. गल्लीतल्या 25 मुलांना तरी भारताकडून खेळायचं असतं. त्यामुळं तुमचा बॅकअप प्लॅन असला पाहिते. माझे कुटुंबीय कॅनडात राहतात.'
तो पुढे म्हणाला की, 'मी विचार केला होता की माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी माझ्या काकांकडे तिकडे जाणार होतो. पहिल्यांदा आम्ही सर्व कुटुंबीयच जायचं असं विचार होता. मात्र माझी आई तिकडे जाण्यास तयार नव्हती तेथील संस्कृती वेगळी आहे. मी नशिबवान आहे की माझा पहिलाच प्लॅन यशस्वी ठरला. नाहीतर मला माहिती नाही कदाचित मी कॅनडाकडून क्रिकेट खेळलो असतो. मात्र माझा पहिला प्लॅनच यशस्वी ठरल्याचा माला आनंद आहे. मी भारतीय संघाकडून खेळतोय, मुंबई इंडियन्सकडून खेळतोय.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.