Kane Williamson| IPL 2023 Cricket News in Marathi 
IPL

World Cup 2023: विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, दुखापतग्रस्त केन विल्यमसन बाहेर!

आयपीएलमुळे न्यूझीलंड क्रिकेटला मोठा धक्का

Kiran Mahanavar

Kane Williamson World Cup 2023 : विश्वचषकापूर्वी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. अनुभवी कर्णधार आणि खेळाडू केन विल्यमसन दुखापतीमुळे एकदिवसीय विश्वचषकातून जवळपास बाहेर आहे. आयपीएल 2023 मध्येच केन विल्यमसन जखमी झाला होता.

आयसीसी ट्रॉफीचे सामने भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हा आयपीएलच्या 16व्या हंगामात गुजरात टायटन्सचा भाग होता, परंतु पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झेल घेण्याच्या प्रयत्नात तो आधीच जखमी झाला होता. आता न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने विल्यमसनच्या दुखापतीबाबत मोठा अपडेट दिला आहे.

32 वर्षीय केन विल्यमसन हा न्यूझीलंड वनडे संघाचा कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याने 40 शतके झळकावली आहेत. क्रिकेट न्यूझीलंडने सांगितले की, केन विल्यमसनच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मंगळवारी स्कॅन केल्यानंतर, आयपीएलदरम्यान क्षेत्ररक्षण करताना त्याचे लिगामेंट फाटल्याचे समोर आले आहे. अशा स्थितीत यानंतरचे पुनर्वसन पाहता त्याच्यासाठी विश्वचषक खेळणे कठीण आहे. विल्यमसनने कसोटीत 28 आणि एकदिवसीय सामन्यात 13 शतके झळकावली आहेत.

विल्यमसनला विश्वचषक खेळणे कठीण असले तरी. याबाबत केन विल्यमसन म्हणाला की, मी पुढील काही महिन्यांत गॅरी आणि संघाला पाठिंबा देण्यासाठी जे काही करू शकतो ते करण्यास उत्सुक आहे.

न्यूझीलंडने 2019 मधील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केल्याची माहिती आहे. सामना बरोबरीत सुटल्यानंतर इंग्लंडने त्याला चौकार मोजण्याच्या नियमानुसार पराभूत केले. दरम्यान गुजरात टायटन्सने विल्यमसनच्या जागी श्रीलंकेच्या दासुन शनाकाचा समावेश केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: एसबीआयने करोडो ग्राहकांना दिला झटका ते शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का?

आजचे राशिभविष्य - 16 नोव्हेंबर 2024

Panchang 16 November: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे

Child Marriage: अल्पवयीन पत्नीसोबत लैंगिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

Mumbai Local Mega Block: रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या कसे असेल शेड्यूल

SCROLL FOR NEXT