Shakib Al Hasan | Cricket News in Marathi 
IPL

IPL 2023: पहिला सामना हरल्यानंतर KKRला मोठा धक्का! शकीब अल हसन संपूर्ण हंगामातून बाहेर

शाकिब अल हसनला केकेआरने यावेळी त्याच्या मूळ किंमत 1.5 कोटी रुपयांना विकत घेतले आणि...

Kiran Mahanavar

IPL 2023 Shakib Al Hasan : बांगलादेश क्रिकेट संघ आणि केकेआरचा झंझावाती अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन IPL 2023 मधून बाहेर पडला आहे. या हंगामात तो का उपलब्ध नाही याचे कारण कोलकाता नाइट रायडर्स फ्रँचायझीला कळवले आहे. आंतरराष्ट्रीय बांधिलकी आणि वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. फ्रँचायझीचा अन्य बांगलादेशी खेळाडू लिटन दास या आठवड्याच्या अखेरीस संघात सामील होण्याची अपेक्षा आहे.

शाकिब अल हसनला केकेआरने यावेळी त्याच्या मूळ किंमत 1.5 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. Cricbuzz नुसार शाकिबने त्याच्या फ्रँचायझीला कॉल केला आणि या हंगामात न खेळण्याचे सांगितले. असं असलं तरी कोणताही फ्रँचायझी त्या हंगामात खेळाडूला विकत घेतल्यानंतर संघातून वगळू शकत नाही.

शाकिब अल हसन या हंगामात केकेआरचा भाग नसेल, परंतु लिटन दास 10 एप्रिलपर्यंत या संघात सामील होऊ शकतो. लिटन दासला केकेआरने 50 लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले होते. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला सांगितले होते की त्यांचे खेळाडू 8 एप्रिल ते 1 मे पर्यंत फक्त आयपीएलसाठी उपलब्ध असतील.

त्याचवेळी 4 ते 8 एप्रिल दरम्यान होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी शाकिब आणि लिटन दास संघासाठी उपलब्ध असावेत अशी बीसीबीची इच्छा आहे. अशा परिस्थितीत शाकिबला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी फक्त 20 दिवस मिळतील. पण काही कौटुंबिक कामामुळे शाकिबने फ्रँचायझीला त्याच्या अनुपलब्धतेची माहिती दिली.

शाकिब अल हसनने चार हंगामात केकेआरसाठी एकूण 51 सामने खेळले आहेत. दुसरीकडे या मोसमात केकेआरने आतापर्यंत एक सामना खेळला आहे ज्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. केकेआरला आता त्यांचा दुसरा सामना त्यांच्या घरच्या मैदानावर खेळायचा आहे जिथे त्यांचा गुरुवारी आरसीबीशी सामना होईल. यावेळी आरसीबीचे कर्णधारपद श्रेयस अय्यरऐवजी नितीश राणाच्या हाती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT