Ramandeep Singh Has Been Fined 20% Match Fees Breaching IPL Code Of Conduct bcci sakal
IPL

IPL 2024 : KKRच्या खेळाडूवर BCCIने घेतली मोठी ॲक्शन; कारवाईचे कारण अस्पष्ट पण दिली 'ही' शिक्षा

Kiran Mahanavar

Ramandeep Singh Breaching IPL Code of Conduct : बीसीसीआयने आयपीएल 2024 दरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी केकेआरच्या आणखी एका खेळाडूवर कारवाई केली आहे. या खेळाडूने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.20 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा केला होता, त्यामुळे बीसीसीआयने या खेळाडूला शिक्षा सुनावली आहे.

केकेआरच्या खेळाडूवर बीसीसीआयची मोठी कारवाई

कोलकाता नाईट रायडर्सच्या रमणदीप सिंगला शनिवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्याचा गुन्हा काय हे स्पष्ट झालेले नाही. कोलकाता आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यांनंतर बोर्डाने हे पाऊल उचलले.

आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "कोलकाता नाईट रायडर्सच्या रमनदीप सिंगवर 11 मे रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे झालेल्या आयपीएल 2024 च्या 60 व्या सामन्यात आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल रमणदीपला 20 दंड ठोठावण्यात आला आहे."

निवेदनात पुढे म्हटले आहे की, त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. आचारसंहितेच्या लेव्हल 1 भंगासाठी मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे. मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रमणदीपने आठ चेंडूंत १७ धावा केल्या. या नाबाद खेळीदरम्यान त्याने 212.50 च्या स्ट्राईक रेटने एक चौकार आणि एक षटकार मारला.

पावसामुळे 16-16 षटकांच्या खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर, केकेआरने प्रथम फलंदाजी करत 157 धावा ठोकल्या. केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक 42 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघ 20 षटकांत केवळ 139 धावा करू शकला आणि 18 धावांनी सामना गमावला. मुंबईचा या हंगामातील हा नववा पराभव आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT