KKR Vs LSG IPL 2024 Marathi News sakal
IPL

KKR Vs LSG : शेवटच्या सामना दोन्ही संघाचा झाला होता पराभव! त्यामुळे प्लेइंग-11 मध्ये होणार बदल...

Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants : लखनौ सुपर जायंटस्‌ व कोलकता नाईट रायडर्स यांच्यामध्ये आज आयपीएलची साखळी फेरीची लढत रंगणार आहे. दोन्ही संघांना मागील लढतीत पराभवाचा सामना करावा लागला असून त्यामुळे आता विजयी पुनरागमनासाठी उभय संघ प्रयत्नशील असतील.

Kiran Mahanavar

Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants : लखनौ सुपर जायंटस्‌ व कोलकता नाईट रायडर्स यांच्यामध्ये आज आयपीएलची साखळी फेरीची लढत रंगणार आहे. दोन्ही संघांना मागील लढतीत पराभवाचा सामना करावा लागला असून त्यामुळे आता विजयी पुनरागमनासाठी उभय संघ प्रयत्नशील असतील.

कोलकता संघ आता पुढील पाच सामने घरच्या मैदानावर खेळणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही जमेची बाजू असणार आहे. युवा वेगवान गोलंदाज मयंक यादवची दुखापतीमुळे अनुपस्थिती लखनौसाठी चिंता वाढवणारी असून कर्णधार श्रेयस अय्यरचा सुमार फलंदाजी फॉर्म कोलकतासाठी डोकेदुखी ठरत आहे.

सुनील नारायण व आंद्रे रसेल या वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी कोलकता संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला; पण चेन्नईविरुद्धच्या लढतीत नारायण २७ धावांवर, तर रसेल १० धावांवर बाद झाला आणि कोलकता संघाला फक्त १३७ धावांपर्यंतच मजल मारता आली. या लढतीत चेन्नईकडून कोलकता संघाचा पराभव झाला. याआधी कोलकता संघाने दोन वेळा २००च्या वर धावा फटकावल्या होत्या. यावरूनच नारायण व रसेल या खेळाडूंचे संघातील महत्त्व प्रकर्षाने दिसून येते.

चिंतेचा विषय

कोलकता संघासाठी फलंदाजांचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. कर्णधार श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रमणदीप सिंग, रिंकू सिंग यांच्याकडून आतापर्यंत चमकदार कामगिरी झालेली नाही. श्रेयसकडून ०, नाबाद ३९, १८, ३४ अशा धावा झालेल्या आहेत. व्यंकटेशने बंगळूरविरुद्धच्या लढतीत अर्धशतक झळकावले; पण इतर लढतींमध्ये तो अपयशी ठरला. रमणदीप व रिंकूचीही तीच अवस्था आहे. हे सर्व फलंदाज फॉर्ममध्ये येण्याची प्रतीक्षा संघ व्यवस्थापनाला असणार आहे.

स्टार्कचा सुमार फॉर्म

कोलकता फ्रँचायझीने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याच्यावर विक्रमी बोली लावत आपल्या संघात समाविष्ट केले; पण त्याने आतापर्यंत खेळलेल्या चार लढतींमध्ये फक्त दोनच फलंदाज बाद केले आहेत. तसेच ११च्या सरासरीने त्याच्या गोलंदाजीवर धावांची लूट करण्यात आली आहे. वैभव अरोरा, हर्षित राणा, आंद्रे रसेल, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती या खेळाडूंवर कोलकता संघाचा गोलंदाजी विभाग अवलंबून आहे.

तगडी फलंदाजी

लखनौच्या संघात एकापेक्षा एक असे सरस फलंदाज आहेत. कर्णधार के. एल. राहुल, क्विंटॉन डी कॉक, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन या स्टार फलंदाजांच्या समावेशामुळे लखनौचा संघ ताकदवान बनला आहे; मात्र दिल्लीविरुद्धच्या लढतीत हे फलंदाज अपयशी ठरले आणि त्यांचा पराभव झाला. देवदत्त पडिक्कल व दीपक हुडा या भारतीय फलंदाजांना फॉर्मात येण्याची गरज आहे. आयुष बदोनी याने दिल्लीविरुद्धच्या लढतीत अर्धशतकी खेळी साकारत लखनौला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली.

बिश्‍नोई, कृणालवर मदार

वेगवान गोलंदाज मयंक यादव दुखापतीमुळे आणखी दोन सामने तरी खेळू शकणार नाही. अशा वेळी नवीन उल हक, यश ठाकूर या वेगवान गोलंदाजांसह रवी बिश्‍नोई व कृणाल पंड्या या फिरकीपटूंवर लखनौच्या गोलंदाजीची मदार असणार आहे. दिल्लीविरुद्धच्या लढतीत अर्शद खान याला गोलंदाजीत ठसा उमटवता आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT