Kolkata Knight Riders | IPL 2024 Sakal
IPL

IPL 2024, KKR Vs LSG : अखेर केकेआरने कोड क्रॅक केला; सॉल्टच्या सॉलिड खेळीनं लखनौविरूद्ध साजरा केला पहिला विजय

Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Scorecard Updates News : सुपर संडेमध्ये आज आयपीएल 2024 मध्ये 28 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे.

Pranali Kodre, Kiran Mahanavar

Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants, IPL 2024 :

सुपर संडेमध्ये (14 एप्रिल) आयपीएल 2024 मध्ये 28 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला गेला. हा सामना कोलकाता नाईट रायडर्सने 8 विकेट्सने जिंकला.

या सामन्यात कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर लखनौने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 161 धावा केल्या आणि कोलकातासमोर 162 धावांचे आव्हान ठेवले.

लखनौकडून निकोलस पूरनने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली, तर कोलकाताकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 विकेट्स घेतले आहेत.

लखनौने दिलेले 162 धावांचे आव्हान कोलकाताने 15.4 षटकात 2 विकेट्स गमावत पूर्ण केले. कोलकाताकडून फिल सॉल्टने 89 धावांची सर्वोच्च खेळी केली. लखनौकडून मोहसीन खानने 2 विकेट्स घेतल्या आहेत.

IPL 2024 KKR Vs LSG: अखेर केकेआरने कोड क्रॅक केला; सॉल्टच्या सॉलिड खेळीनं लखनौविरूद्ध साजरा केला पहिला विजय

10 षटकांनंतरही लखनौला कोलकाताची विकेट घेता आली नाही. सॉल्टने अर्धशतक पूर्ण केल्यानंतरही आपली लय कायम ठेवत कोलकाताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने 16 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कोलकातासाठी विजयी चौकार ठोकला. तसेच सॉल्ट आणि श्रेयस यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 120 धावांची नाबाद भागीदारी केली.

फिल सॉल्टने 47 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारांसह 89 धावांची नाबाद खेळी केली, तसेच श्रेयस अय्यरने 38 चेंडूत 38 धावांची खेळी केली.

IPL 2024 KKR Vs LSG Live Score : फिल सॉल्टचा लखनौला अर्धशतकी दणका, 10 षटकातच कोलकाताच्या 100 धावा पार

पॉवर-प्लेमध्येच 2 विकेट्स गमावल्यानंतर कोलकाताचा डाव सलामीला फलंदाजीला आलेल्या सॉल्टने कर्णधार श्रेयस अय्यरला साथीला घेत सावरला. सॉल्टने काही आक्रमक शॉट्स खेळत 26 चेंडूत अर्धशतकही पूर्ण केले. यासह 10 षटकात कोलकाताने 2 बाद 101 धावा केल्या.

IPL 2024 KKR Vs LSG Live Score : मोहसिनने कोलकाताला दिला दुहेरी धक्का; नारायणपाठोपाठ रघुवंशीलाही धाडलं पॅव्हेलियनमध्ये

मोहसिनने नारायण पाठोपाठ चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अंगक्रिश रघुवंशीला बाद केले. त्याचा झेल यष्टीरक्षक केएल राहुलने पकडला. रघुवंशी 6 चेंडूत 7 धावा केल्या.

IPL 2024 KKR Vs LSG Live Score : धोकादायक नारायणचा अडथळा मोहसीन खानने केला दूर

पहिल्या षटकात 22 धावा निघाल्यानंतर दुसऱ्या षटकात मात्र मोहसिन खानने चांगली गोलंदाजी केली. त्याने पहिल्या पाच चेंडूत एकही धाव दिली नव्हती, याशिवाय त्याने धोकादायक सुनील नारायणला अवघ्या 6 धावांवर बाद केले.

IPL 2024 KKR Vs LSG Live Score : पहिलाच सामना अन् जोसेफची पहिलीच ओव्हर तब्बल 10 चेंडूंची; लखनौविरुद्ध कोलकाताची दमदार सुरुवात

लखनौने दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी कोलताकडून सुनील नारायण आणि फिल सॉल्ट उतरले, तर पहिल्या षटकात गोलंदाजीसाठी लखनौकडून शामर जोसेफ उतरला.

पहिलाच सामना खेळणाऱ्या जोसेफसाठी हे पहिले षटक फारसे चांगले ठरले नाही. त्याने या षटकात 2 वाईड आणि 2 नो बॉल टाकले. त्यामुळे त्याला एकूण 10 चेंडू या षटकात टाकायला लागले. 2 वाईडपैकी एका चेंडूवर चौकारही गेला. या षटकात एकूण 22 धावा निघाल्या.

IPL 2024 KKR Vs LSG Live Score : पूरनच्या आक्रमण अन् लखनौचे कोलकातासमोर 162 धावांचे लक्ष्य; स्टार्कला मिळाल्या तीन विकेट्स

स्टार्कने 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अर्शद खानला त्रिफळाचीत केले. यामुळे त्याने तीन विकेट्स पूर्ण केल्या. यासह लखनौचा डाव 20 षटकात 7 बाद 161 धावांवर संपला.

IPL 2024 KKR Vs LSG Live Score : आक्रमक खेळणाऱ्या पूरनला स्टार्कने दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता, अर्धशतक थोडक्यात हुकलं

पाच विकेट्स गेल्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये निकोलस पूरनने आक्रमक खेळ केला होता. त्यामुळे त्याने लखनौला दीडशे धावांचा टप्पा पार करून दिला.

मात्र, तो अर्धशतकाजवळ असताना शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मिचेल स्टार्कने त्याला बाद केले. त्याचा झेल सॉल्टने घेतला. पूरनने 32 चेंडूत 45 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 2 चौकार 4 षटकार मारले.

IPL 2024 KKR Vs LSG Live Score : आयुष बडोनीचा अडथळा नारायणने केला दूर

आयुष बडोनी निकोलस पूरनसह लखनौचा डाव पुढे नेत होता. परंतु, त्याचा अडथळाही सुनील नारायणने दूर केला. त्याला 15 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नारायणने अंगक्रिश रघुवंशीच्या हातून झेलबाद केले. बडोनीने 27 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह 29 धावांची खेळी केली. 15 षटकापर्यंत लखनौने 5 बाद 113 धावा केल्या.

IPL 2024 KKR Vs LSG Live Score : लखनौला मोठा धक्का! केएल राहुलनंतर धोकादायक स्टॉयनिसही स्वस्तात परतला माघारी

केएल राहुल बाद झाल्यानंतर स्टॉयनिस फलंदाजीला आला होता. पण तो 5 चेंडूत 10 धावांवरच माघारी परतला. त्याला 12 व्या षटकात वरुण चक्रवर्तीने चकवले. या षटकातील चौथ्या चेंडूवर स्टॉयनिसचा अफलातून झेल यष्टीरक्षक फिल सॉल्टने घेतला.

IPL 2024 KKR Vs LSG Live Score : लखनौला मोठा धक्का! 10व्या षटकानंतर रसेलने कर्णधार केएल राहुलला धाडलं माघारी

खेळपट्टीवर स्थिरावलेल्या केएल राहुलला 11 व्या षटकात आंद्रे रसेलने 39 धावांवर बाद केले. रसेलने टाकलेल्या या षटकातील पहिल्या चेंडूवर राहुलने षटकार ठोकला होता. परंतु, पुढच्याच चेंडूवर त्याला रसेलने डीप-मीड विकेटला रमणदीप सिंगच्या हातून झेलबाद केले.

IPL 2024 KKR Vs LSG Live Score : केएल राहुलने बडोनीसह सावरला लखनौचा डाव, 10 षटकात झाल्या 'इतक्या' धावा

पहिल्या दोन विकेट्स पॉवरप्लेमध्ये गमावल्यानंतर लखनौचा डाव कर्णधार केएल राहुलने आयुष बडोनीला साथीला घेत सावरला होता. त्यामुळे लखनौने 10 षटकात 2 बाद 72 धावा केल्या. 10 षटके झाली तेव्हा केएल राहुल 33 धावांवर आणि बडोनी 18 धावांववर खेळत आहेत.

IPL 2024 KKR Vs LSG Live Score : दीपक हुड्डा आला अन् गेला... लखनौला मोठा धक्का! इतक्या धावांवर पडली दूसरी विकेट

कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपरजायंट्सला दुसरा धक्का दिला आहे. दीपक हुड्डाला मिचेल स्टार्कने पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. हुड्डा 10 चेंडूत आठ धावा करून बाद झाला. आयुष बडोनी नवा फलंदाज म्हणून क्रीझवर आला आहे.

IPL 2024 KKR Vs LSG Live Score : तुफानी सुरूवातनंतर लखनौला मोठा धक्का, इतक्या धावांवर पडली विकेट

क्विंटन डी कॉक आऊट झाला आहे. वैभव अरोराने डी कॉकला बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. डी कॉक आठ चेंडूत 10 धावा करून बाद झाला. आता दीपक हुड्डा कर्णधार केएल राहुलसह क्रीजवर आहे.

IPL 2024 KKR Vs LSG Live Score : लखनौची तुफानी सुरूवात.... पहिल्याच ओव्हर ठोकल्या इतक्या धावा

डी कॉकने ओव्हरच्या पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. पहिल्या षटकात संघाने 10 धावा केल्या. डी कॉक 10 धावा करून खेळत आहे. राहुलला अद्याप खाते उघडता आलेले नाही. कोलकाताने दुसरे षटक वैभव अरोराकडे सोपवले आहे.

IPL 2024 KKR Vs LSG Live Score : दोन्ही संघात मोठे बदल, जाणून घ्या प्लेइंग ११

कोलकाता नाईट रायडर्स : फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

लखनौ सुपर जायंट्स : क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), दीपक हुडा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, शामर जोसेफ, यश ठाकूर.

IPL 2024 KKR Vs LSG Live Score : कोलकाताने जिंकली नाणेफेक...

लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरने या सामन्यासाठी रिंकू सिंगला बाहेर ठेवले असून त्याच्या जागी हर्षित राणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे.

शमर जोसेफ लखनौ संघात पदार्पण करणार आहे. या सामन्यासाठी लखनौने काही बदल केले आहेत. या सामन्यासाठी देवदत्त पडिक्कल आणि नवीन उल हक यांची निवड करण्यात आलेली नाही, तर दीपक हुड्डा आणि मोहसीन खानचे पुनरागमन झाले आहे.

KKR vs LSG लखनौसमोर कोलकाता रायडर्सचे 'गंभीर' आव्हान... जाणून घ्या किती वाजता सुरू होणार सामना?

कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता होणार आहे. टॉस त्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी 3 वाजता होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

जीगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

Waris Pathan: वारिस पठाण पत्रकार परिषद सुरु असतानाच ढसाढसा रडले, म्हणाले, सगळेच माझ्या मागे हात धुवून मागे लागले अन...

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

SCROLL FOR NEXT