Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi News sakal
IPL

KKR Vs RR IPL 2024 : टेबल टॉपरमध्ये रंगणार थरार...! ईडन गार्डनवर कोलकता-राजस्थान संघांमध्ये रस्सीखेच

KKR Vs RR IPL 2024 : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील दोन अव्वल संघ आज (ता. १६) कोलकतामधील ईडन गार्डन या ऐतिहासिक स्टेडियममध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

Kiran Mahanavar

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील दोन अव्वल संघ आज (ता. १६) कोलकतामधील ईडन गार्डन या ऐतिहासिक स्टेडियममध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. राजस्थानचा संघ दहा गुणांसह पहिल्या स्थानावर असून कोलकताचा संघ आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. दोन्ही संघांनी आपला मागील सामना जिंकला असून आता याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी उभय संघ प्रयत्नशील असतील.

गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकता संघाने २०१२ व २०१४ या वर्षांमध्ये आयपीएलच्या अजिंक्यपदावर मोहोर उमटवली. या दोन्ही अजिंक्यपदात सुनील नारायण याने महत्त्वाचा वाटा उचलला होता. आता गंभीर कोलकता संघाच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. महत्त्वाचे म्हणजे नारायण या मोसमात छान खेळ करीत आहे. फलंदाजी तसेच गोलंदाजी या दोन्ही विभागांत त्याच्याकडून अव्वल दर्जाची कामगिरी होत आहे. त्याने आतापर्यंत १६७ धावा फटकावल्या असून पाच फलंदाजही बाद केले आहेत. नारायणला बांधून ठेवण्याचे काम राजस्थानला याप्रसंगी करावे लागणार आहे.

आठ षटके चौकाराविना

सुनील नारायण याने हैदराबादविरुद्धच्या लढतीत १९ धावा देत एक फलंदाज बाद केला. तसेच लखनौविरुद्धच्या लढतीत १७ धावा देत एक फलंदाज बाद केला. या दोन्ही सामन्यांत त्याने गोलंदाजीत प्रकर्षाने दिसून येईल अशी लक्षणीय कामगिरी केलेली नाही, पण दोन सामन्यांतील आठ षटकांमध्ये त्याच्या गोलंदाजीवर एकही चौकार लगावला गेला नाही. ही वाखाणण्याजोगी बाब. हैदराबाद व लखनौच्या फलंदाजांना रोखण्यात तो यशस्वी ठरला. याचा फायदा कोलकता संघाला झाला. दोन्ही लढतींमध्ये कोलकता संघाने विजय संपादन केले.

कोलकत्याला हवीय फलंदाजीत सुधारणा

फिल सॉल्ट व सुनील नारायण या सलामीवीरांकडून कोलकता संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. दोघांनाही आतापर्यंत ठसा उमटवता आला आहे, पण इतरांना अपयश आले आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने लखनौविरुद्ध नाबाद ३८ धावांची खेळी केली असली तरी त्याच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव दिसून येत आहे. रिंकू सिंगला या मोसमात सूर गवसलेला नाही. नितीश राणा दुखापतीमुळे बाहेर आहे. अशा परिस्थितीत ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, केशव महाराज यांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर कोलकता संघातील फलंदाजांचा कस लागू शकतो. रवीचंद्रन अश्‍विन तंदुरुस्त असल्यास त्यालाही संघात संधी मिळू शकते. कोलकता संघाने फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे.

राजस्थानची फलंदाजी वि. कोलकताची गोलंदाजी

राजस्थान रॉयल्सची फलंदाजी तगडी आहे. कर्णधार संजू सॅमसन, रियान पराग यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. त्यांच्या कामगिरीत सातत्यही दिसून येत आहे. जॉस बटलर तंदुरुस्त असल्यास त्यांचा संघात समावेश होईल. यशस्वी जयस्वाल सुमार फॉर्ममधून जात आहे, पण सध्या तरी राजस्थानला याचा तोटा झालेला नाही. तो जर फॉर्ममध्ये आला, तर मात्र राजस्थानचा आनंद गगनात मावेनासा होईल. कोलकताची गोलंदाजी विरुद्ध राजस्थानची फलंदाजी असाच हा सामना असणार आहे. मिचेल स्टार्क फॉर्मात आला असून वैभव अरोरा, हर्षित राणा, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती व आंद्रे रसेल या कोलकत्याच्या गोलंदाजांकडून प्रभावी कामगिरी होत आहे. याच कारणामुळे दोन संघांमधील लढत क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT