KL Rahul IPL 2023 
IPL

WTC फायनलपूर्वी टीम इंडिया टेन्शनमध्ये! हा दिग्गज खेळाडू IPL मध्ये सतत होतोय फ्लॉप अन्...

या खेळाडूला संधी दिली तर टीम इंडियाचे ट्रॉफीचे स्वप्न भंगू शकते अन्...

Kiran Mahanavar

KL Rahul IPL 2023 : आयपीएल 2023च्या दरम्यान बीसीसीआयने मंगळवारी WTC फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा केली होती. भारताला या वर्षी सात जूनला लंडनमधील ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी डब्ल्यूटीसी फायनलसाठी निवडलेल्या संघातील खेळाडू आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवत आहेत.

काही खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, तर काही अजूनही फॉर्मच्या शोधात आहेत. त्यापैकी एक खेळाडू म्हणजे केएल राहुल. राहुल अद्याप फॉर्ममध्ये परतलेला नाही. परिस्थिती अशी बनली आहे की लोक केएल राहुलच्या टीम इंडियातील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

आयपीएलमध्ये शुक्रवारी पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात वापरण्यात आलेली खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम होती. पण लखनौचा कर्णधार केएल राहुल या खेळपट्टीवरही धावा करू शकला नाही. या सामन्यात राहुलने केवळ 12 धावा केल्या. त्याचा संघ 20 षटकात 257 सारखी मोठी धावसंख्या उभारत आहे. संघाचे इतर फलंदाज 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा करत आहेत. केएल राहुल तिथे अपयशी ठरत आहे. यावरून केएल राहुल खराब फॉर्मशी झुंजत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आयपीएल 2023 मध्ये केएल राहुलचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. भारतीय संघासोबत डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळण्यासाठी जाणाऱ्या खेळाडूंमध्ये केएल राहुलच्या नावाचाही समावेश आहे. केएलला वारंवार संधी देऊनही त्याला लय सापडत नाही.

मात्र, अंतिम फेरीत शुभमन गिल सलामी करू शकतो, असे मानले जात आहे. पण इंग्लिश परिस्थितीतील त्याचे जुने विक्रम लक्षात घेऊन कर्णधार रोहित शर्माने गिलच्या जागी केएल राहुलला संधी दिली तर टीम इंडियाचे ट्रॉफीचे स्वप्न भंगू शकते.

आयपीएलच्या या हंगामातील केएल राहुलच्या कामगिरीवर एक नजर टाकली तर त्याने 8 सामन्यात 114.64 च्या स्ट्राइक रेटने केवळ 274 धावा केल्या आहेत. राहुल दरवर्षी चांगल्या स्ट्राईक रेटने आणि सरासरीने धावा काढायचा, किमान आयपीएलमध्ये, टीम इंडियासाठी नाही तर.

मात्र यंदा आयपीएलमध्येही त्याला धावा करता आल्या नाहीत. अशा परिस्थितीत डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यापूर्वी केएल राहुल फॉर्ममध्ये परतावा अशी प्रार्थना चाहते करत असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

SCROLL FOR NEXT