नवी दिल्ली: बंगळुरू विरूद्धच्या सामन्यात पंजाब संघाला अटीतटीच्या लढतीत ६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. RCB च्या संघाने २० षटकात ७ बाद १६४ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलचे अर्धशतक (५७) आणि देवदत्त पडीकलच्या ४० धावांच्या जोरावर बंगळुरूने मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना मयंक-राहुल जोडीने नेहमीप्रमाणे दमदार सुरूवात केली. पण शेवटच्या टप्प्यात पंजाबला आव्हानाचा पाठलाग करण्यास अपयश आलं. लोकेश राहुलच्या सर्वाधिक धावा असल्या तरीही त्याला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करता आलेलं नाही आणि तो चांगला कर्णधार होऊ शकत नाही, असं रोखठोक मत भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जाडेजाने व्यक्त केला.
"तुम्ही लोकेश राहुलकडे कर्णधार म्हणून पाहत असाल तर मी सांगू इच्छितो की राहुल गेली दोन वर्षे पंजाब संघाचा कर्णधार म्हणून खेळत आहे. पण तो संघाचे नेतृत्व करतोय असं कधीही वाटलं नाही. जेव्हा त्याचा संघ चांगला किंवा वाईट खेळतो तेव्हा कधीही संघात करण्यात आलेले बदल हे त्याने केलेले असतील असं वाटत नाही. भारतीय संघाचे कर्णधार हे त्यांच्या चातुर्यावर निवडले जातात. त्यांच्यात नेतृत्वकौशल्य हवं ही प्राथमिक अपेक्षा असते. राहुलमध्ये ती क्षमता आहे असं मला वाटत नाही. कारण तो खूप मितभाषी आणि मृदू आवाजात बोलणारा आहे. तो चांगला कर्णधार होऊ शकत नाही", असं राहुलने स्पष्ट केलं.
"कर्णधार असणाऱ्या माणसाच्या आवाजात थोडीशी जरब असायलाच हवी. राहुल मात्र सर्व प्रकारच्या गोष्टींमध्ये समाधान मानतो. जर राहुल एखाद्या दिवशी कर्णधार झाला तर त्यामागे एक कारण असं असू शकतं की तो खूप काळापासून संघात आहे. जो खेळाडू संघात शांतपणे आपली जागा सांभाळून असतो तो कर्णधार म्हणून कधी ना कधी निवडला जातो. पण ज्याच्याकडे नेतृत्वकौशल्य असतं ते लोक एका ठराविक मानसिकतेतून संघाचे नेतृत्व करत असतात. भारतीय संघाच्या कर्णधाराकडे त्याचा स्वत:चा एक विचार असतो जो संघाला पुढे घेऊन जातो. IPL कर्णधार आणि टीम इंडियाचा कर्णधार यात खूप फरक आहे. भारताचा कर्णधार बनायचं असेल तर खूप जास्त गोष्टी सांभाळाव्या लागतात", असंही अजय जाडेजा म्हणाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.