Kolkata Knight Riders Likely Won IPL 2024 Trophy esakal
IPL

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

अनिरुद्ध संकपाळ

Kolkata Knight Riders Likely Won IPL 2024 Trophy : आयपीएल 2024 मधील 51 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा 24 धावांनी पराभव केला. वानखेडेवर मुंबईला पराभूत करण्याची ही केकेआरचा आयपीएल इतिहासातील दुसरीच वेळ होती. यापूर्वी त्यांनी 2012 मध्ये मुंबईला मुंबईच्या होम ग्राऊंडवर मात दिली होती.

तब्बल 12 वर्षानंतर वानखेडेवर विजय मिळवल्याने केकेआरचा चाहते भलतेच खूश आहे. त्याचबरोबर आता त्यांचा केकेआर यंदाची आयपीएल जिंकणार असा विश्वासही दुणावला आहे. कारण 2012 च्या 4 योगायोग 2024 मध्ये जुळून येत आहेत.

2012 अन् 2024 मधील चार योगायोग

1- कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत दोनवेळा आयपीएलवर नाव कोरलं आहे. 2012 आणि 2014 च्या हंगामात केकेआरने विजेतेपद पटकावलं होतं. 2012 मध्ये केकेआरने ज्यावेळी विजेतेपद मिळवलं त्यावेळी गतविजेते हे चेन्नई सुपर किंग्ज होते. आताही गतविजेते हे चेन्नई सुपर किंग्जच आहे.

2- तब्बल 12 वर्षापूर्वी रोहित शर्माने आयपीएलमध्ये शतकी खेळी केली होती. यंदाच्या हंगामात देखील रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे.

3 - केकेआरने 2012 च्या हंगामात मुंबईला वानखेडे स्टेडियमवर हरवलं होतं. आता 2024 मध्ये देखील केकेआरने मुंबई इंडियन्सला वानखेडे स्टेडियमवर पराभूत केलं आहे.

4 - 2012 मध्ये आयपीएलची फायनल चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवली गेली होती. यंदाची आयपीएल फायनल देखील चेपॉकवरच होणार आहे. केकेआरने 2012 मध्ये सीएसकेला 5 विकेट्सनी पराभूत केलं होतं.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर मुंबईविरूद्धच्या सामन्यात केकेआरने 196 धावा ठोकल्या. त्यात व्यंकटेश अय्यरने 70 धावांचे योगदान दिलं होतं. तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळलेला मनिष पांडेने 42 धावांचे योगदान दिले.

केकेआरचे 170 धावांचे आव्हान घेऊन मैदनात उतरलेल्या मुंबईची सुरूवात खराब झाली होती. त्यांची टॉप ऑर्डर ढेपाळली. त्यानंतर सूर्यकुमार यादवनं 56 धावा करत कडवी झुंज दिली. त्याला टीम डेव्हिडने 24 धावा करत चांगली साथ दिली होती.

मात्र केकेआरकडून मिचेल स्टार्क आणि आंद्रे रसेलने दमदार गोलंदाजी केली. स्टार्कने 4 विकेट्स घेतल्या तर रसेलने दोन विकेट्स घेतल्या. या दोघांनी स्लॉग ओव्हरमध्ये चांगला मारा करत केकेआरचा विजय साकार केला. याचबरोबर वरूण चक्रवर्ती आणि सुनिल नारायणने प्रत्येकी 2 विकेट्स घेत मुंबईच्या टॉप ऑर्डर उडवली होती.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT