Rinku Singh KKR : आयपीएल 2023 च्या 56 व्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. दरम्यान, केकेआरचा स्टार मॅच फिनिशर आणि लास्ट ऑव्हर स्पेशलिस्ट रिंकू सिंहवर आज सर्वांची नजर असणार आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात रिंकू सिंहने दोनवेळा केकेआरला शेवटच्या षटकात विजयश्री मिळवून दिली होती. रिंकूच्या या जबरदस्त खेळीमुळे त्याचा टीम इंडियासाठी विचार व्हावा अशी मागणी होत आहे. दरम्यान, भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगने रिंकू लवकरच निळ्या जर्सीत दिसेल अशी भविष्यवाणी केली.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला की, 'रिंकू सिंगच्या डोक्यावर भारताची कॅप दिसणार आहे. हा क्षण फार लांब नाहीये. तो एक प्रेरणादायी खेळाडू आहे. तो आज ज्या स्थानावर पोहचला आहे त्यासाठी त्याने खूप कष्ट घेतले आहेत. त्याने स्वतःवरचा विश्वास कधी ढळू दिला नाही आत्मविश्वासाचे श्रेय त्यालाच जाते. त्याने युवा खेळाडू आणि मुलांसमोर त्याच्या आयुष्याच्या प्रवासाचा एक आदर्श ठेवला आहे.'
रिंकू सिंहने यंदाच्या आयपीएल हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यात 56.17 च्या सरासरीने 337 धावा केल्या आहेत. त्याचे स्ट्राईक रेट हे 151.12 इतके आहे. रिंकू सिंहने यंदाच्या हंगामात दोन अर्धशतके देखील ठोकली आहेत. केकेआर आज राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे. ते दोघेही 10 गुणांवर आहेत. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी केकेआरला राजस्थाननंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्याविरूद्ध देखील खेळायचे आहे.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केकेआरसाठी रिंकू सिंहने मोठे योगदान दिले आहे. केकेआरला आशा आहे की उरलेल्या महत्वाच्या सामन्यात देखील रिंकू सिंह चांगली कामगिरी करेल. केकेआरला संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान विरूद्धच्या सामन्यात विजय मिळवणे खूप गरजेचे आहे. राजस्थानने त्यांच्या गेल्या पाच सामन्यातील चार सामने गमावले आहेत. जर केकेआरने सामना जिंकला तर राजस्थानचे प्ले ऑफचे स्वप्न जवळपास संपुष्टात येईल.
रिंकू सिंहबद्दल मोहम्मद कैफ म्हणाला की, 'रिंकूकडे मॅच्युरिटी आहे. त्याचे फूटवर्क चांगले आहे. तो चांगल्या प्रकारे स्ट्राईक रोटेट करतो. रिंकू त्याचा चांगला फॉर्म हा एका चांगल्या खेळीत रुपांतरीत करतोय. तो पाहिजे त्या वेळी त्याचा गिअर बदलू शकतो.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.